संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवलीतील सागाँव-सागर्ली येथील सागावेश्वर मंदिर जवळ २० हजार दशलक्ष पाणी साठवणूक क्षमता असणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. कोरोनाचे संकट पाहता यावेळी मोजक्याच कार्यकर्त्यांनासह हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. यावेळी भाजप च्या माजी नगरसेविका डॉ.सुनीता पाटील, नामदेव पाटील, सुहासिनी राणे, पूनम पाटील, जनार्दन भोईर, भाऊ ठाकूर, प्रफुल पठारे, ऋषिकेश देशमुख, उमेश भंडारे, वसंत सुखदरे, छाया कांबळे, दिलीप पाटील आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
भविष्यातील पाण्याची टंचाई लक्षात घेता मागील अनेक वर्षांपासून माजी नगरसेविका डॉ.पाटील ह्या महानगरपालिकडे पाठपुरावा करत होत्या. माजी नगरसेविका सुनीता पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. पुढील वर्षभरात प्रभागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी निघेल असे यावेळी डॉ.सुनीता पाटील यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच अमृत योजना अंतर्गत व कल्याण-डोंबिवली (मुंबई महानगर प्रदेश) मध्ये अनेक कामं मंजूर करवून घेउन बरीच कामे जलद गतीने होत आहेत. बरीचशी कामे प्रगतीपथावर आहेत त्याबद्दल माजी नगसेविका डॉ. सुनीता पाटील, पालकमंत्री एकनाथजी शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि आमदार रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले.