Latest News गुन्हे जगत महाराष्ट्र

डोंबिवलीतून तलवारी, बटन चाकू पकडले; गुन्हे शाखा युनिट-३ कल्याण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील गुन्हे शाखा युनिट-३ कल्याण पोलिसांनी छापामारी ची कारवाई करत डोंबिवलीतून तलवारी, बटन चाकू पकडून सदर प्रकरणी एकास अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, दिनांक ३०.०६.२०२१ रोजी खास बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, इसम नामे संदीप काष्टे व त्याचा मित्र रवि पवार हे घातपात करण्याचे हेतुने तलवारी, चाकु व धारदार हत्यारे जमा करून संदीप काष्टे हा राहत असलेल्या दुमजली घराच्या वरच्या मजल्यावरील रूममध्ये जमले आहेत. त्या अनुषंगाने लागलीच गुन्हे शाखा युनिट-३ कार्यालय नेमणुकीतील पो.अधिकारी/अंमलदार असे पंचासह मिळालेल्या माहिती प्रमाणे डोंबिवली पुर्व येथे छापामारी कारवाई करणे करिता पाठविले असता सदर ठिकाणी आरोपी रवि राजु पवार हा मिळुन आला सदर ठिकाणी घराची झाडाझडती केली असता,
१) १,०००/- रू एक लोखंडी धारदार तलवार, तिस लोखंडी मुळ त्यास पत्र्याचे आवरण असलेली, तिचे पात्याची लांबी २५ इंच व रूंदी दिड इंच असुन पात्याची पुढील बाजु निमुळती असलेली जुवाकिंसु
२) १.०००/- रू एक कापडाचे आवरण असलेले पत्र्याचे म्यान असलेली लोखंडी धारदार तलवार, तिस लोखंडी मुठ त्यास पत्र्याचे आवरण असलेली, तिचे पात्याची लांबी २५ इंच व रूंदी दिड इंच असुन पात्याची पुढील बाजु निमुळती असलेली जुवाकिंसु
३) २००/- रू एक लोखंडी धारदार फोल्डींगचा पितळी मुळ असलेला चाकु, मुठेची लांबी ८ इंच, पात्याची लांबी ७ इंच व रूंदी दिड इंच असुन पात्याची पुढील बाजु निमुळती असलेली जुवाकिंसु
अशी शस्त्रे मिळुन आली आहेत.

सदर प्रकरणी मिळुन आलेली शस्त्रे जप्त करुन डोबिवली पो.स्टे. येथे फिर्याद नोंद करुन डोंबिवली पो.स्टे. गु.र.नं. १७७/२०२१ शस्त्र अधिनियम कलम ४,२५ सह म.पो.अॅक्ट कलम ३७(१)(३)/१३५ प्रमाणे अन्वये दखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला असून, आरोपी रवि राजु पवार, यांस गुन्हयात अटक करण्यात आली आहे तसेच सदर गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीस न्यायालयात हजर करण्याची तजवीज ठेवली आहे.

पाहिजे आरोपी संदिप काष्टे याचा शोध सुरु असुन आरोपींनी शस्त्र कोठुन आणली व आरोपीत हे शस्त्रासह काही घातपात, दखलपात्र गुन्हे करणार होते याबाबत गुन्हे शाखा युनिट-३ कल्याण चे पोलीस करत आहे.

सदरची यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भूषण दायमा, पोउपनिरी. नितीन मुदगुन पोउपनिरी. मोहन कळमकर, पोलीस हवालदार राजेंद्र खिलारे, दत्‍ताराम भोसले, अजित राजपूत, मंगेश शिर्के, सचिन वानखडे, हरिश्चंद्र बंगारा, सचिन साळवी पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *