संपादक : मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह खंडणी प्रकरणातील २८ जणांच्या विरूध्द ‘लुक आउट’ नोटीस जारी करा अशी मागणी
या प्रकरणातील फिर्यादी सोनू जालान आणि केतन तन्ना या तक्रारदारांनी केली आहे.
ठाणे नगर पोलीस ठाण्यात केतन तन्ना आणि क्रिकेट बुकी सोनू जालान यांनी ही ‘लुक आउट’ नोटीस जारी करण्याची
मागणी केली आहे. ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे, विकास दाभाडे अशा २८ जणांनी सोनू जालान आणि केतन तन्ना यांच्यावर दबाव आणून त्यांच्याकडून करोडो रूपयांची खंडणी उकळल्याची तक्रार ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणात मुख्यतः तत्कालीन पोलीस आयुक्तच आरोपी असल्यामुळं पोलीस सावधगिरीने तपास करत आहेत. याच प्रकरणात तत्कालीन पोलीस आयुक्तांसह इतर आरोपी परदेशात पळून जाण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्या विरोधात ‘लूक आऊट’ नोटीस जारी करावी अशी मागणी जालान आणि तन्ना या दोन्ही तक्रारदारांनी केली आहे.