संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
उल्हासनगर मध्ये एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्या प्रकरणी रोशन माखिजा व पंकज त्रिलोकानी ह्यांच्यावर ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनांक १४/०५/२०२१ रोजी मनोज तोलानी व त्यांची अल्पवयीन मुलगी आरती तोलानी हे दोघे घरी असताना सकाळी रोशन माखिजा व पंकज त्रिलोकानी त्यांच्या घरी येऊन मनोज तोलानी ह्यांच्याकडे काही काम आहे असे सांगून घरात घुसले.
ओळखीचे असल्याने त्यांनी त्या दोघांना घरात घेतले असता ह्या दुकलीने त्यांना सांगितले के आमचा एक साथीदार पण भेटायला येणार असल्याने आम्ही त्याला तुमच्याच घरी बोलावले आहे, तरी तुम्ही काही नाश्ता घेऊन या असे सांगून त्यांच्या खिशात ₹ २०००/- टाकले व बाकीचे पैसे तुम्हाला ठेवा असे म्हटले, मनोज तोलानी घरा बाहेर पडताच ह्यांनी सदर अल्पवयीन मुलगी घरातील भांडी धूत असताना रोशन माखिजा ह्याने तिला मागून मिठी मारली व चुंबन घेण्याचा प्रयत्न केला असता मुलीने आरडाओरड चालू केली तितक्यात पंकज त्रिलोकानीने तिचे तोंड दाबले व तिच्या शरीराशी अश्लील चाळे करू लागले सदर मुलगी त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती पण हे दोन्हीही नराधम तिच्यावर तुटून पडले त्याच क्षणी, कोणीतरी दरवाज़ा ठोठावला म्हणून तिने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत बाहेर पळाली व तिला स्वतःला वाचवण्यात यश आले.
त्या नंतर हि दुकली घराबाहेर पडली व तिथून निघून गेले, हि बाब जेव्हा तिच्या कटुंबाला माहिती पडली तेव्हा त्यांनी सदर घटने बाबत पोलीस ठाण्यात अर्ज केला होता. सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेत झोन-४ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहायक पोलीस आयुक्त डी.डी टेळे ह्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले असता त्यांनी सदर घटने बाबत चौकशी करून गुन्हा दाखल करण्यास सांगितले. दिनांक ०६/०८/२०२१ रोजी हा गुन्हा उल्हासनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे पण अजून कोणालाही अटक केलेली नाही.
सूत्रांकडून मिळलेल्या माहितीच्या आधारे रोशन व पंकज हे गेली २ महिने फरार आहेत कारण ह्यांच्यावर गुन्हे शाखा, ठाणे इथे पण एक खंडणीचा गुन्हा दाखल आहे, उल्हासनगर स्थित असलेल्या एका व्यापाऱ्याला गँगस्टर सुरेश पुजारी ह्याच्या मार्फत खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे. रोशन माखिजा हा कुख्यात गुन्हेगार आहे ह्याच्यावर ह्यापूर्वी पण भादवि कलमानुसार ३०७, ४२० इत्यादी गुन्हे दाखल आहेत, गुन्हे शाखा, ठाणे व उल्हासनगर पोलीस त्यांचा कसून तपास घेत आहेत.