संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
नौपाडा पोलीसांनी उल्लेखनीय कामगिरी करत ठाण्यातील दोन मोठे गुन्हे उघडकीस आणले आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन घरफोडी करणाऱ्या महिला व त्यांच्या साथीदाराला मोठ्या शिताफिने नौपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तर दुसऱ्या गुन्ह्यात अनाथआश्रमांना दान करायचे आहे अशी बतावणी करून व्यवसायिकांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला गजाआड केले आहे.
पहिल्या गुन्ह्यात नौपाडा पोलीसांकडे अज्ञात चोरीचा गुन्हा दाखल होता, त्या प्रमाणे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ व पोलीस निरीक्षक रविंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप गोसावी पोलीस उप निरीक्षक विनोद लभडे यांच्या टीमने तपासाला सुरुवात केली, ज्या ठिकाणी चोरी झाली तेथील सिसिटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्या मध्ये काही महिला चोरी करताना दिसून आल्या व एक व्यक्ती बाहेर फिरत असताना दिसून आला, त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने या ठिकाणी काही महिला चोरी करत असताना पहिले व त्यांच्या सोबत एक ऑटो रिक्षा असल्याचे सांगितले, या रिक्षाचा शोध घेत असताना व आठ ठिकाणाचे सिसिटीव्ही फुटेज पहिले असता ही रिक्षा कळवा नाका मार्गे नवी मुबंईच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले, पोलिसांना फुटेज मध्ये रिक्षाचा नंबर स्पष्ट पणे दिसून आला, त्या वरून रिक्षा मालकाचा शोध घेतला असता, ही रिक्षा मालकाने आकाश कच्छि या इसमास चालवण्यास दिल्याचे समजले, त्या प्रमाणे त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने चोरी केल्याची कबुली जवाब दिला व त्याच्या बरोबर त्यांची बायको शीतल काच्छि त्याची नातेवाईक सुमन कच्छि, त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या नंदिनी गायकवाड व रुक्मिणी कांबळे या असल्याचे सांगितले या महिलांना पोलीसांनी मुकुंद कंपनी, ईश्वरनगर संजीवनी शाळेच्या मागे भोला शेठ कळवा येथून ताब्यात घेतले व त्यांनी चोरलेला ६९ हजार रुपयाचा २३ पाण्याच्या मोटरी, ४० हजार रुपयाच्या टेबल ड्रॉवर चॅनेल, २० हजार रुपयाचे आल्यूमिनिम सेक्शन, ४० हजार रुपयाचे ड्रीलिंग स्टॅन्ड व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण ३,१९,०००/- रुपये किंमतीचा माल ताब्यात घेतला.
दुसऱ्या गुन्ह्यात चरई येथील ज्योती बुक स्टोअर्स यांना एका इसमाने फोन करून आपण एनजीओ मधून सचिन शहा बोलत असून आश्रमातील गरीब विद्यार्थाना वाटप करण्यासाठी अप्सरा पेन्सिलचे १०८० बॉक्स हवे आहेत, असे सांगुन ही ऑर्डर भिवंडी येथे पोहच करण्यास सांगुन ऑर्डर मिळाल्यावर तुमची रक्कम देतो असे सांगितले, तिथे माल घेऊन गेल्यावर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करतो असे सांगितले, त्या नंतर नेटवर्कचा काही प्रॉब्लेम आहे मी रक्कम देतो तो पर्यंत तुम्ही हा माल मला द्या वस्तूंचे मुलांना वाटप करायचे आहे, प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत, आणि कार्यक्रमाला वेळ होत असे सांगुन माल दुसऱ्या गाडीत टाकून ती घेऊन पसार झाला, या बाबत पोलीस पथकाने या इसमाचा शोध घेतला असता ह्या आरोपीने यापूर्वी ही अशाप्रकारचे गुन्हे मुबंई, नवी मुंबई, ठाणे परिसरात केल्याचे निष्पन्न झाले, हा आरोपी मालाड येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पोलीस तेथे पोहचले असता तो थोड्याच दिवसांपूर्वी तेथून पसार झाल्याचे समजले, त्या नंतर पोलीसांना बोरिवली, उल्हासनगर येथेही त्याचे वास्तव्य असल्याचे समजले पण आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याने तो त्याचे ठिकाण वारंवार बदलत होता,पोलीसांना त्याचा शोध घेणे अतिशय खडतर झाले होते, पण काही दिवसांनी पोलीसांना माहिती मिळाली हा आरोपी आपलं अस्तित्व लपवून विरार या ठिकाणी वावरत आहे त्या प्रमाणे तांत्रिक तपास करत पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले, त्याची चौकशी केली असता त्याचे नाव सचिन प्रवीण शहा वय ४० वर्ष असून तो मूळ राहण्यास मुलुंड येथील चंद्रभवन चाळ येथे राहत असल्याचे निष्पन्न झाले , त्याच्या कडे चोरलेल्या मुद्देमालची चौकशी केली असता त्याने हा लंपास केलेला माल आश्रम शाळेत दोन, चार हजारला विकून टाकला, पोलीसांनी त्याला अटक करून कोर्टासमोर हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे.