राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संवाद मेळावा संपन्न
संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी
मिरा भाईंदर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचा सवांद मेळावा मिरारोड मध्ये पार पडला या वेळी राज्याचे जलसंपदा मंत्री व प्रदेशाध्यक्षजयंत पाटील व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. पक्षातील मतभेद बाजूला ठेवून संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन मंत्री जयंत पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या मेळाव्याचे निमंत्रण पत्रकारांना देखील देण्यात आले होते त्यामुळे या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात पत्रकार देखील उपस्थित होते आणि त्याच वेळी जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांच्या विरोधात काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली त्यावेळी उपस्थित पत्रकारांकडून त्याचे चित्रीकरण केले जात असताना पत्रकारांना या कार्यक्रमात कुणी बोलावले? असे नेत्यांकडून बोलण्यात आल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी पत्रकारांशी बाचाबाची सुरू केली त्यानंतर नाराजी व्यक्त करून पत्रकार त्या कार्यक्रमातून निघून गेले. थोड्यावेळाने सगळ्यांना शांत केल्यानंतर हा कार्यक्रम सुरू करण्यात आला.
संपुर्ण राज्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांशी परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहेत. पालघर नंतर आज मिरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी सवांद साधला यावेळी स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मत जाणून घेतले. काही दिवसापूर्वी जिल्हाध्यक्षपदी काँग्रेस मधून आलेल्या अंकुश मालुसरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे बऱ्याच जुन्या कार्यकर्त्यांनी प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोर आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी समजूत काढून जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांची नियुक्ती केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली काम करणे बंधनकारक आहे आता बदल होणार नाही. पक्ष संघटना बळकट करा सर्व जुन्या नव्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करा असा संदेश जिल्हाध्यक्ष मालुसरे यांना दिला.
शहरातील पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे त्यावर लवकरच सर्व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून तोडगा काढू व राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे इथे एकत्र मिळून निवडणूक लढण्याचा प्रयत्न करू मात्र तसे शक्य न झाल्यास स्थानिक पातळीवर पक्षांना एकत्र करून येणाऱ्या महापालिका निवडणुकी लढू असे मत मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांचा चांगलाच समाचार घेतला शहारत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कशी वाढेल यावर लक्ष द्या. रोज सकाळी उठून प्रदेश कार्यलयात जाऊन एकमेकांच्या तक्रारी करत बसू नका. पक्षांनी जिल्ह्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवली आहे, त्यांना सोबत घेऊन काम करा असा सज्जड दम नाराज कार्यकर्त्यांना दिला. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत जास्त नाही तरी पण १५ ते २० नगरसेवक निवडून येतील असा विश्वास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.