Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

गुन्हे शाखा युनिट-3 कल्याण कडून डोंबिवली पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील तडीपार खतरनाक नामचीन गुंड जेरबंद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दि.३०.११.२०२१ रोजी रात्री ८.०० च्या दरम्यान डोंबिवली पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील सराईत तडीपार गुंड – सनी परशुराम जाधव हा ज्योती नगर झोपडपट्टी परिसरात डोंबिवली पूर्व येथे येणार असल्याची वर्णनासह गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी पोलीस हवालदार – दत्‍ताराम भोसले मुख्यालय ठाणे शहर, यांना मिळाल्याने त्यांनी गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांना फोनद्वारे संपर्क करून कळवल्याने त्यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ एक पथक पोउपनिरी- मोहन कळमकर,सपोउपनिरी- संजय माळी, पोलीस हवालदार-वसंत बेलदार, सचिन वानखेडे, विश्वास माने यांना बातमी मिळाल्या ठिकाणी तात्काळ रवाना केले.

सदर ज्योतीनगर परिसरात पोलीस दबा धरून बसलेले असताना दिलेल्या वर्णनाप्रमाणे एक इसम दुर्गा माता मंदिरासमोर फिरत असताना दिसला त्यास पोलीस पकडण्यास जवळ जात असताना त्याला पोलीसांचा संशय येताच तो पळण्याच्या तयारीत असताना त्यास झडप घालून पकडले, त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव सनी परशुराम जाधव (वय ३८) वर्षे रा.ज्योती नगर झोपडपट्टी आयरे गाव डोंबिवली पूर्व, असे सांगितले सदर आरोपीत इसम डोंबिवली पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील धारदार शस्त्राने वार करणारा खतरनाक नामचीन गुंड असून त्याच्यावर ५ गुन्हे दाखल असून त्याची दहशत असल्याने त्यास मा.पोलिस उप आयुक्त सोा,परिमंडळ – ३ कल्याण यांचे आदेशान्वये दि.२४.०८.३०२१ रोजी पासून ठाणे जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार (तडीपार) करण्यात आलेले असताना त्याने सदर आदेशाचा भंग केल्याने त्याच्या वर गुन्हे शाखा युनिट-३ कल्याण कडून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे कायदेशीर कारवाई करून पुढील तपासा करिता डोंबिवली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून सदर तडीपार गुंडावर गुन्हे शाखा युनिट-३ कल्याण चे पोलीसांनी कारवाई करून जेरबंद केल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *