मिरा भाईंदर: युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तरुणजी बकोलीया आणि महिला राष्ट्रीय अध्यक्षा सौ. सुमनजी मौर्य यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जितेंद्र दगडू सकपाळ व महिला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सौ. सुवर्णा कदम यांच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष भास्कर बोदडे आणि महाराष्ट्र सहसचिव शामु भिंगारदिवे यांचा प्रमुख उपस्थितीत आणि ठाणे जिल्हाध्यक्ष जयवंत पाटील आणि महिला जिल्हाध्यक्ष सौ स्नेहा नडे यांच्या उपस्थितीत ठाणे स्टेशन वाहतूक नियत्रंण पोलिस अधिकारी आणि स्थानिक पोलिस यांचा सत्कार करून पुष्पगुच्छ शाल आणि मास्क वाटप करून कार्यक्रमास सुरुवात केली तसेच गोरगरीब व गरजू लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास ASI पवार साहेब ASI कदम साहेब तसेच स्थानिक पोलिस निरीक्षक पांढरे साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी स्थानिक पोलिस पाटील, घोरपडे, ठाकरे, वाघमारे इ. उपस्थितीत होते. या सर्वांचा युनिव्हर्सल ह्युमन राईट्सच्या जिल्हा सचिव दिपाली महाले यांचाही सत्कार करण्यात आला आणि त्यांना विदेशात जाण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सौ उषा बोरुडे, वर्षा शेट्टी ठाणे जिल्हा सहसचिव शुभम राय ठाणे शहर अध्यक्ष अमोल पोपलघट ठाणे शहर सचिव संतोष चव्हाण, कासारवडवली ब्लॉक अध्यक्ष सुमित सिंह उपस्थितीत होते.