Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

केंद्र सरकार कडून महाराष्ट्र राज्याला ३५५ कोटींचा राष्ट्रीय आपत्तीनिधीतून निधी मंजूर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्रात आलेल्या पूर स्थितीच्या नुकसानापोटी केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत महाराष्ट्र राज्याला ३५५.३९ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर झाला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीने पाच राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशासाठी पूर आणि भूस्खलनाच्या नुकसानापोटी १,६८२.११ कोटी रुपयांची अतिरिक्त केंद्रीय मदत मंजूर केली.

महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये वर्ष २०२१ मध्ये आलेल्या पूर आणि भूस्खलन या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानापोटी या पाच राज्यांना १,६६४.२५ कोटी आणि पुद्दुचेरीला १७.८६ कोटी रुपयांची अतिरिक्त केंद्रीय मदत मंजूर केली आहे.

केंद्राकडून मंजूर अतिरिक्त मदत केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) मध्ये राज्यांसाठी जारी केलेल्या निधीपेक्षा अधिकचा निधी आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *