__
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
उन्हाळा सुरू झाला आहे त्यात फळांचा राजा म्हणजे ‘आंबा’ याचा सुद्धा मोसम आणि हंगाम सुरू झाला आहे. सर्वांना ज्ञात आहेच की, भारतात दररोज कोट्यावधी आंबे खाल्या जातात आणि त्याचे ‘बाटे’ रोज केरात फेकल्या जातात. हे सहसा कचरा किंवा रस्त्यावर उतरते. मुंबई येथील एक अवलिया डॉमिनिक फर्नांडिस ज्याला ‘मँगो मॅन’ असे संबोधले जाते यांनी हे बाटे जमवून बियाणे म्हणून काही स्वयंसेवी संस्थांना देण्याचा विचार केला जे नंतर ते महाराष्ट्रातील शेतकर्यांना पाठवतील जेणेकरून त्यांना शाश्वत उपजीविका मिळेल.
हा एक महान विचार आहे नाही का ? एक उत्तम कामाची संधी. ते लोकांना बिया नीट धुवून स्वच्छ करायला सांगतात आणि नंतर त्या उन्हात वाळवून त्याच्याकडे पार्सल करायचं असते.
आपण एकवेळ श्वास घेणे थांबवू शकत नाही परंतु आपण एक सुजाण नागरिक म्हणून जे करू शकतो ते म्हणजे आपण श्वास घेत असलेली हवा शुद्ध करणे. त्याच शुद्ध श्वासांसाठी ही एक धावपळ हीच या उपक्रमाची संकल्पना असून आपण सर्व साथ द्याल असे अपेक्षित आहे. पत्ता जाणून घेण्यासाठी व्हॉट्सऍप् करा..
डॉमिनिक फर्नांडिस – 9966633632