संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
दिनांक १०.०५.२०२२ रोजी सावंतवाडी येथील कुणकेरी गावात सावंतभोसले कुळाच्या श्री कुलस्वामिनी व्यानमाता भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ सोहळा यंदा गेल्या दोन वर्षांनी कोविड परिस्थिती नंतर आटोक्यात आलेल्या प्रतिबंधात्मक निर्बंध शिथिल करण्यात आल्याने मोठ्या दिमाखात हा सोहळा भव्य दिव्य पणे साजरा करण्यात आला.
गेल्या अनेक दशकांपासून साजरा होणाऱ्या या कुलस्वामिनी व्यानमाता भवानी देवीच्या त्रैवार्षिक गोंधळ सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र, गुजरात व गोवा या राज्यातून सावंतभोसले कुळाच्या भाविकांनी सहकुटुंब सहपरिवरासह हजारोंच्या संख्येने उपस्थित होत हजेरी लावली.
सावंतभोसले श्री कुलस्वामिनी प्रतिष्ठन संस्थेचे अध्यक्ष श्री.विजय सावंतभोसले, सरचिटणीस श्री. कृष्णा सावंतभोसले व सल्लागार व कुलस्वामीनी देवघर प्रमुख श्री. शशिकांत सावंतभोसले या सावंतभोसले श्रीकुलस्वामीनी प्रतिष्ठान च्या पदाधिकाऱ्यांनी अथक मेहनत व परिश्रम घेत हा भव्य दिव्य सोहळा मोठ्या दिमाखात पार पाडला.
त्रैवार्षिक भवानी व्यानमाता देवीच्या गोंधळानिमित्त येऊन रणरणत्या उन्हात ओटी भरण्यासाठी तासोनतास रांगेत उभ्या असणाऱ्या भाविकांना संस्थेच्या वतीने थंडगार पाणी व सरबताची उत्तम सोय करण्यात आली होती. प्रतिष्ठान चे कार्यकर्ते व स्वयंसेवक रांगेत उभ्या असणाऱ्या लोकांना थंडगार पाणी व सारबताचे वाटप करत होते. त्याशिवाय दर्शनासाठी आलेल्या कुळातील समस्त भाविकांना प्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ हजारोंच्या संख्येने आलेल्या समस्त भक्तांना लाभला. त्यात कुलस्वामीनी भवानी व्यानमाता ची ओटी भरून जमलेल्या साड्या किरकोळ किंमत आकारून देवीचा प्रसाद म्हणून भाविकांना वाटण्यात आल्या.
रात्रभर सुरू असलेला कुलस्वामिनी व्यानमाता भवानी देवीच्या त्रैवार्षिक गोंधळ उत्सव कार्यक्रमाची सांगता पहाटे करण्यात आली.