संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी दिनानिमित्त शहर वाहतूक उपविभाग शाखा डोंबिवली तर्फे डोंबिवली वाहतूक उपविभाग हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.उमेश गीत्ते यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलीस अधिकारी, अंमलदार व वॉर्डन तसेच ‘डोंबिवली रायडर्स क्लब’ यांच्या संयुक्त विद्यमाने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने सदरची बाईक रॅली डोंबिवली पूर्वेकडील रामनगर येथून सुरु होऊन इंदिरा चौक, टिळक चौक, कोपर पूल, सम्राट चौक, कोल्हापुरे चौक, गुप्ते रोड, मच्छी मार्केट, कोपर पूल व परत रामनगर येथे समाप्त झाली. या बाईक रॅलीद्वारे वाहतुक विभागातर्फे वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचा संदेश देण्यात आला.