संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
आपल्या मधुर स्वराने लाखो गीतांना अजरामर करणाऱ्या स्वर्गीय गायिका लता मंगेशकर यांच्या नावने लवकरच संगीत महाविद्यालय सुरु होणार असून, पुढील महिन्यात २८ सप्टेंबरला हे महाविद्यालय सुरु होणार असल्याचे समजते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे. लता मंगेशकर यांचा स्वर हा केवळ भारतीयांच्या परिचयाचा नसून त्या विदेशात सुद्धा प्रसिद्द आहेत.
संगीत महाविद्यालयात आता विद्यार्थी-विद्यार्थिनी पदवी सोबतच, प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतील. मुंबई येथील कलिना परिसरात या महाविद्यालयासाठी जागा हस्तांतरित केली गेली असून, तेथे सुसज्ज असे महाविद्यालय उभारण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटद्वारे सांगितले.