संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
काळा जादू करण्यासाठी मांडूळ सापाची तस्करी करण्याऱ्या पाच जणांच्या टोळीला कल्याण झोन -३ च्या डीसीपी स्कॉड ने अटक करत ७० लाख रुपये किंमतीचा २ किलो ६०० ग्रॅम वजनाचा ४४ इंच लांबीचा एक दुर्मिळ प्रजातीचा मांडूळ वन्यजीव साप जप्त केला आहे व या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ता पाच जणांच्या टोळीने किती लोकांना असे मांडूळ साप विकले आहेत याचा पुढील तपास कल्याण झोन-३ चे पोलीस करत आहेत.
कल्याण झोन-३ चे उपयुक्त सचिन गुंजाळ यांना माहिती मिळाली की पालघर येथें राहणारे काही लोकं मांडूळ साप विकण्यासाठी कल्याणला येणार आहेत. डीसीपी स्कॉड चे संजय पाटील, ऋषिकेश भालेराव, सदाशिव देवरे सह पथकाने रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अग्रवाल कॉलेज जवळ सापळा रचला. ३ दुचाकी वरून ६ लोकं संशयित रित्या पोलीसांना येताना दिसले. डीसीपी स्कॉड पथकाचा संशय बळावल्याने त्यांनी ता सहा जणांना थांबवून त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडून मांडूळ साप आढळण्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खडकपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३३३/२०२२ वन्यजीवन (संरक्षण) अधिनियम १९७२ व सुधारित अधिनियम २००३ मधील कलम ३९(३)(अ) सह कलम ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे व
मांडूळ वन्यजीव सर्प हस्तगत करून तो वनविभाग व मानद वन्यजीव रक्षक, कल्याण जिल्हा ठाणे यांच्या ताब्यात सुरक्षिततेकरिता देण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पूर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, मा. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, परिमंडळ – ३ कल्याण व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, कल्याण विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक नंदकुमार केचे, पोलीस निरीक्षक शरद झिने (गुन्हे), खडकपाडा पोलीस ठाणे, कल्याण (प), पोहवा.पाटील, पोकॉ. भालेराव नेम-नियंत्रण कक्ष कल्याण, पोहवा. शेले, पोहवा.देवरे, पोकॉ बोडके व पोकॉ. तागड नेमणूक खडकपाडा कल्याण (प) यांनी केलेली आहे.