Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

विमानतळावर आता ‘चेक इन’ करण्याकरिता नवीन कार्य प्रणाली सुरू..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ‘चेक इन’ ची प्रक्रिया अनेकदा मनस्ताप देणारी होती. आता मात्र नवीन कार्य प्रणाली मुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ‘दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड’ तर्फे बीटा प्रणालीवर आधारित ‘डिजीयात्रा ऍप’ लाँच केले आहे. हा ऍप ‘अँड्रॉइड युजर्स’ आणि विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आला आहे. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (डीआयएएल) नुसार एकदा का नोंदणी करून या ऍप ची सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना त्यांचे ओळखपत्र आणि बोर्डिंग पास कागदोपत्री बाळगण्याची गरज भासणार नाही. विशेष म्हणजे या ऍपच्या मदतीने प्रवाशांना पेपरलेस आणि अखंडपणे विमानतळावर प्रवेश घेता येणार आहे. (डीआयएएल) नुसार विमानतळावर प्रवाशांचा प्रवेश पेपरलेस आणि अखंडपणे करणे हाच उद्दिष्ट आहे. ज्यामुळे वेळेची बचत होईल म्हणजेच आता ऍपच्या मदतीने प्रवाशांना ‘फेशियल रेकग्निशन’ तंत्रज्ञानाद्वारे विमानतळावर प्रवेश दिला जाईल. हा ऍप प्रवाशांना चेहऱ्यावरील ओळख तंत्रज्ञानाद्वारे ओळखेल जे त्यांच्या बोर्डिंग पासशी जोडलेले आहे.

दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (डीआयएएल) कडून एका निवेदनाद्वारे जाहीर करण्यात आले आहे की, मोबाईल मधील ऍपच्या मदतीने चेहऱ्याच्या ओळखीच्या आधारावर सर्व चेकपॉईंट्सवर प्रवाशांना प्रवेश दिला जाणार आहे. एअरपोर्ट एन्ट्री, सिक्युरिटी चेक आणि बोर्डिंग गेट या तिन्ही ठिकाणी याच ऍपवरूनच प्रवेश दिला जाणार आहे. दिल्ली विमानतळावर, टी-३ टर्मिनलवर देशांतर्गत प्रवाशांसाठी ही कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे.

दिल्ली विमानतळ आणि बंगळुरू विमानतळाच्या देशांतर्गत प्रवाशांच्या चेहऱ्याच्या ओळखीसाठी हा ऍप कार्यरत करण्यात आला आहे. या ऍपमुळे प्रवाशांची विमानतळावर होणाऱ्या सर्व त्रासांपासून मुक्तता होणार आहे. सध्या ह्या ‘डिजीयात्रा ऍप’चे बीटा व्हर्जन कार्यरत करण्यात आले आहे आणि लवकरच ते फुल स्केलवर ऑफर केले जाण्याची शक्यता आहे. निवेदनात म्हटले आहे की, या ऍपच्या साहाय्याने चेहऱ्याच्या आधारावर प्रवाशांची प्रवेश प्रक्रिया सर्व चेकपॉईंट्सवर केली जाणार आहे. एअरपोर्ट एन्ट्री, सिक्युरिटी चेक आणि बोर्डिंग गेट या तिन्ही ठिकाणी याच ऍपवरून प्रवाशांना प्रवेश दिला जाणार आहे. दिल्ली विमानतळावर टी-३ टर्मिनलवर देशांतर्गत प्रवाशांसाठीच हा ऍप सुरू करण्यात आला आहे. एअर एशिया इंडीया, एअर इंडिया, इंडिगो, स्पाईसजेट आणि विस्तारा या टर्मिनलवरून हा ऍप चालणार आहे.

बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (बीआयएएल) कडून त्यांच्या एका वेगळ्या निवेदनामध्ये ‘डिजियात्रा बायोमेट्रिक सिस्टम’च्या बिटा कार्यप्रणालीची ‘विस्तारा’ आणि ‘एअर एशिया’ च्या फ्लाईट्सवर चाचणी घेण्यात आली आहे. तर त्यांनी सांगितले की, ‘डिजियात्रा ऍप’ ची बीटा आवृत्ती ‘अँड्रॉइड ओएस’ साठी ‘गुगल प्ले स्टोअर’ वर उपलब्ध आहे. ‘ऍपल च्या आयओएस’ प्लॅटफॉर्मवरही हा ऍप पुढील काही आठवड्यात उपलब्ध होणार आहे. (डीआयएएल) कडून जाहीरपणे सांगण्यात आले आहे की, हा काळ एका बायोमेट्रिकच्या अखंड प्रवासाचा आहे जो चेहरा ओळखणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. प्रवाशांना कोणत्याही अडचणी आणि कागदपत्रांशिवाय विमानतळावर प्रवेश मिळवून देणे हाच या पाठीमागचा मुख्य उद्देश्य आहे. त्याचवेळी, (बीआयएएल) ने सांगितले की ऍपच्या मदतीने, प्रवाशांना यापुढे विमानाने प्रवास करण्यासाठी स्वतः जवळ कागदपत्रे बाळगण्याची गरज नाही. आता प्रत्येक चेक पॉईंट्स बायोमेट्रिक तंत्रज्ञानप्रणाली द्वारे प्रवाशांची ओळख पटवली जाणार असून ही सगळी प्रक्रिया देखील अतिशय सुरक्षित आहे.

सध्या ‘डिजियात्रा बीटा ऍप’ वापरणे पूर्णपणे प्रवाशांच्या इच्छेवर अवलंबून आहे. ज्या प्रवाशांना तो ऍप वापरायचा आहे ते तो ‘गुगल प्ले स्टोअर’ मधून डाउनलोड करू शकतात. ऍपच्या नोंदणीसाठी प्रवाशांना त्यांचा आधार तपशील द्यावा लागणार आहे. याशिवाय, त्यांना कोविड-१९ लसीकरणाबाबत माहितीसह सेल्फी अपलोड करणे गरजेचे असणार आहे. या चाचणी दरम्यान आतापर्यंत सुमारे २० हजार प्रवाशांनी या ऍपद्वारे पेपरलेस आणि सीमलेस विमानतळ एन्ट्री केली आहे. या ऍपच्या मदतीने प्रवाशांना बायोमेट्रिक आणि इतर तपशील एकदाच सादर करावे लागतील. मग या तपशीलाच्या मदतीने विमान प्रवासी त्याच्या आगामी सहली करू शकतो. याचाच अर्थ प्रवाशांना प्रत्येक वेळी बायोमेट्रिक तपशील सादर करावा लागणार नाही.

दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (डीआयएएल) नुसार ‘डिजीयात्रा ऍप’ ची बीटा आवृत्ती ‘गुगल प्ले स्टोअर’ वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झालेली आहे. ‘डिजियात्रा ऍप’ ची आयफोन साठी ‘आयओएस’ आवृत्तीही आठवडाभरात उपलब्ध करून दिली जाईल. ‘डिजियात्रा ऍप’वर तुम्हाला फोन नंबर आणि आधार तपशीलांच्या मदतीने नोंदणी करावी लागेल. यानंतर फोनच्या फ्रंट कॅमेऱ्यातून सेल्फी देऊन सबमिट करावी लागेल व शेवटी लसीकरण तपशील आणि बोर्डिंग पास स्कॅन करून ‘डिजियात्रा ऍप’मध्ये जोडावे लागतील.

बंगळुरू आणि दिल्लीच्या विमानतळांवर ‘डिजियात्रा बोर्डिंग सिस्टम’ आणि ‘इ-गेट’ प्रणाली सुरू करण्यात आली आहे. मात्र भारतातील सर्व देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी ही सेवा टप्प्या-टप्प्याने सूरु करण्यात येणार आहे. याचाच अर्थ आता प्रवासी त्यांची ओळख आणि बोर्डिंग पास प्रमाणीत करण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी करू शकतात. यानंतर, सहज सुलभतेने चेक-इन आणि सुरक्षा तपासणीनंतरच ते त्यांच्या फ्लाईटमध्ये चढू शकतील.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *