संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
आपल्यापैकी बऱ्याच जणांना आता दर महिन्याला रिचार्ज करण्याचा कंटाळा आला असून तीन महिने किंवा सहा महिन्याच्या वैधतेचा रिचार्ज प्लॅन करण्यापेक्षा अनेकांना असे वाटते की, लाईफटाईम वैधतेचा रिचार्ज प्लॅन असायला हवा. परंतु, टेलिकॉम कंपन्यांकडे असा प्लॅन उपलब्ध नाही. आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांकडे असा प्लॅन नसला तरी असा प्लॅन सध्या फक्त एकाचं कंपनी देत आहे. या कंपनीचे नाव आहे ‘एमटीएनएल’. या कंपनीच्या २२५ रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्संना लाईफटाईम वैधता मिळते.
एमटीएनएल कंपनी देतेय असा प्लॅन
हो, तुम्ही जे ऐकलं आहे ते खरंच आहे. या प्लॅनमध्ये एमटीएनएल अनेक फायदे देत आहे. एमटीएनएलचा २२५ रुपयांचा प्लॅन यूजर्ससाठी खुपचं मस्त आणि किफायतशीर आहे. जाणून घ्या या प्लॅनसंबंधी सविस्तर माहिती.
‘एमटीएनएल’ कडून २२५ रुपयात अनेक फायदे
या प्लॅनची किंमत २२५ रुपये आहे. यात यूजर्संना एकदा रिचार्ज केल्यानंतर लाईफटाईम दिलासा मिळणार आहे. यात सिम आणि अकाउंटची वैधता लाईफटाईम आहे. यासोबतच १०० मिनिट कॉलिंग मोफत दिली जाते. व्हॉईस कॉलिंगसाठी प्रति सेकंद ०.०२ पैस या दराने चार्ज केले जाते तसेच एसटीडी कॉलसाठीही हाच चार्ज केला जातो.
‘व्हीआय’ (वोडाफोन आयडिया) कंपनीचा प्लॅन
वोडाफोन-आयडिया कंपनीचा प्लॅन २३९ रुपयाचा आहे. यात यूजर्संना फक्त २४ दिवसाची वैधता मिळते. कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. रोज १ जीबी डेटा आणि रोज मोफत १०० एसएमएस दिले जातात. यात यूजर्संना मोफत ‘हॅलोट्युन’ आणि ‘विंक म्यूझिक’ मोफत दिले जाते.
‘ऐअरटेल’ कंपनीचा प्लॅन
ऐअरटेल कंपनीचा हा प्लॅन २३९ रुपयाचा आहे. यात यूजर्संना २४ दिवसाची वैधता दिली जाते. सोबत नंबर कॉलवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. रोज १ जीबी डेटा आणि रोज मोफत १०० एसएमएस दिले जातात. यात यूजर्संना ‘मोफत हॅलोट्यून’ आणि ‘विंक म्यूझिक’ मोफत दिले जाते.
‘जिओ’ कंपनीचा प्लॅन
जिओ कंपनी २२२ रुपयांचा प्लॅन देत आहे. परंतु हा प्लॅन केवळ जिओ फोन यूजर्ससाठी आहे. यात यूजर्संना २८ दिवसाची वैधता मिळते त्यासोबत रोज २ जीबी डेटा मोफत दिला जातो. अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. मोफत १०० एसएमएस रोज दिले जाते. व त्यांसीबत ‘जिओ ऍप्स’ चे सब्सक्रिप्शन मोफत दिले जाते.