संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव निवडून आलेले आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या आज वाढदिवसानिमित्त डोंबिवली आणि दिवा परिसरात ‘नाहर मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल’च्या संयुक्त विद्यमाने २३ ते ३० सप्टेंबर पर्यंत ‘महात्मा फुले जिवनदायी आरोग्य योजना’ अंतर्गत मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
डोंबिवली पश्चिम येथील ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, ओपन हार्ट सर्जरी, डायलिसिस अश्या असाध्य रोगांवर उपचारांसाठी मोफत वैद्यकीय सुविधा लाभार्थींना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तर अस्थी रोग, नाक, कान, घसा व पोटांच्या विकारावर तपासणी करण्यात येत आहे. तसेच स्त्री रोग विषयावर तज्ञ, ई सी जी तपासणी, रँडम शुगर, पल्स प्रमाण मोजण्यासाठी तज्ञ उपलब्ध करून दिले आहेत. या शिबिराचा लाभ डोंबिवलीतील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन मनसेच्या वतीने शिबीर आयोजक आणि मनसे चे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे यांनी केले आहे.
सदर शिबिराचे मार्गदर्शन मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी केले असून उपशहर अध्यक्ष श्रीकांत वारंगे, राजू पाटील, प्रेम पाटील, विधानसभा क्षेत्र सचिव उदय वेळासकर, शहर सचिव गणेश कदम, संतोष मालुसरे, संदीप (रामा) म्हात्रे, हेमंत दाभोळकर, संकेत तांबे, विजय शिंदे, गौरव गुप्ते, स्वप्नील पाटील इत्यादींचा शिबिराचे आयोजन करण्यात सहभाग आहे. डोंबिवली एमआयडीसी मधील रिजेन्सी येथील नाहर हाॅस्पिटल, आर आर बाज हाॅस्पिटल, मनसेचे फडके रोडवरील मुख्य मध्यवर्ती कार्यालय, दिवा इत्यादी ठिकाणी लाभार्थींना शिबिराच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे असे नाहरचे व्यवस्थापक अरुण जांभळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.