संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
कोरोना च्या जागतिक महाभयंकर महामारीमुळे हातावर पोट असलेले व रोज काम करुन उपजिविका करणारे हातगाडी ओढणारे, रिक्षाचालक, हमाल,फळे व भाजीपाला विक्रेते, कारागीर, घरकामगार, रंगारी इलेक्ट्रिशन, प्लंबर, बिगारी, सलून कर्मचारी, मजूर, छोटे व्यावसायिक इत्यादी अडचणीत आले. अश्या छोट्या व्यावसायिकांना सुलभ कर्ज व परतफेड योजना ‘लाईफ ट्री ट्रस्ट निधी लिमिटेड’ च्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
या संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन डॉ.सुनिता पाटील यांच्या हस्ते सोमवारी सकाळी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले. यावेळी ‘लाईफ ट्री ट्रस्ट निधी लिमिटेड’ संस्थेचे संचालक सुजित नलावडे, भाजप ग्रामीण महिला अध्यक्ष मनिषा राणे, हनुमान ठोंबरे आदी मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
डोंबिवली पश्चिम येथील गोपी टाॅकीज मॉल येथे ‘लाईफ ट्री ट्रस्ट निधी लिमिटेड’ च्या कंपनीचे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. सरकार मान्य कंपनी असून, छोटे व्यावसायिक कोरोनाच्या आर्थिक फटक्यातून आता कुठे सावरु लागले आहेत अश्या व्यावसायिकांना आर्थिक रित्या आधार देण्यासाठी संस्थेच्या वतीने आणि ‘महेश पाटील प्रतिष्ठान’ च्या संकल्पनेतून कंपनीची स्थापना करण्यात आली असल्याचे यावेळी बोलताना सुजित नलावडे यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले.