संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल स्फोटकांचा वापर करून पाडण्यात आला. पण स्फोटांमुळे पूल पूर्णपणे कोसळला नाही, तर खिळखिळा झाला. त्यानंतर पोकलेन मशीनच्या साह्याने पूलाचा उर्वरित भाग पाडण्याचे काम सुरू करण्यात आले. मध्यरात्रीनंतर मोजणी सुरू असताना १ वाजता स्फोट करण्यात आला.
या पुलाचे दगडी आणि सिमेंटचे बांधकाम स्फोटकांमुळे कोसळले असले तरी या पुलाच्या बांधकामात वापरलेले स्टीलचे बांधकाम अबाधित आहे. तसेच ज्या ठिकाणी स्फोटके पेरण्यात आली होती, त्या ठिकाणी सर्व स्फोटकांचा स्फोट झाला नसावा, अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, हा पूल ३० वर्षे जुना होता. मध्यरात्री ठीक १ वाजता पुलाचा स्फोट झाल्यानंतर धुराचे लोट निघाले. मात्र, त्यानंतर १५ मिनिटे प्रतीक्षा करावी लागली. कुठल्या स्फोटकाचा स्फोट होणार होता का ? याची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली.