संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
सर्वोच्च न्यायालयाने खरी शिवसेना कुणाची, यासंदर्भातील निर्णयाचा चेंडू सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कोर्टात टोलवला आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह गोठवले जाऊ शकते, या चर्चेच्या अनुषंगाने बोलत सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेचा दाखला देत महिनाभरात आम्ही चिन्ह लोकांमध्ये पोहोचवले, निवडून आलो आणि सत्तेतही बसलो, अशी प्रतिक्रिया कराडमधील पत्रकार परिषदेत दिली.
धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार की गोठवले जाणार ?
धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार की गोठवले जाणार, यासंदर्भातील चर्चेच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत दहा दिवसांत निवडणूक चिन्ह लोकांपर्यंत पोहोचते. मग ये क्या चीज है, असे एक कार्यकर्ता म्हणाल्याचा किस्सा सांगून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोक सूज्ञ असतात. पण, आम्हीच ते अवघड मानतो. आता तर सोशल मीडिया फास्ट आहे. त्यामुळे नवीन चिन्ह मिळाले तरी लोकांपर्यंत पोहचेल. बंदूक काढणे, थप्पड मारणे ही आपली संस्कृती नाही.
सध्या महाराष्ट्राचे नाव खराब होत आहे
सत्ता गेल्याचे आम्हाला दु:ख नाही. सत्ता येते आणि जाते. परंतु, कोण बंदूक काढतेय, कोण एक थप्पड मारली तर चार थप्पड मारीन म्हणतेय. पन्नास खोके म्हटले तर समोरचा म्हणतो पाहिजेत का तुम्हाला, हे दुर्दैवी आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ज्या पद्धतीने आता महाराष्ट्राचे राजकारण चाललंय त्यामुळे महाराष्ट्राचे नाव खराब होत आहे. देशभरात यापूर्वी कधी महाराष्ट्राची चेष्टा झाली नाही ती आता होतेय, असे सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.