संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीनंतर निवडणूक आयोगाने मूळ शिवसेनेला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव निश्चित करून “मशाल” या निवडणूक चिन्हावर शिक्कामोर्तब केले, यानंतर संपूर्ण राज्यातच ‘मशाल’ चिन्ह मिळाल्याबद्दल शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून राज्यात ठीक ठिकाणी शिवसैनिकांच्या वतीने जल्लोष करण्यात येत आहे.
११ ऑक्टोबर रोजी शिवसेनेच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिकांतर्फे जल्लोष करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवसैनिकांनी मशाल पेटवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास प्रदक्षिणा मारत शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, जय भवानी, जय शिवाजी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता यावेळी आतिषबाजी करून पेढे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख सदानंद थर्वळ, नासिक संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर, डोंबिवली विधानसभा संघटक तात्या माने, कल्याण-डोंबिवली महानगर संघटक वैशाली दरेकर, महिला आघाडीच्या कविता गावंड, मंगलाताई सुळे, किरणताई मोंडकर, शिल्पा मोरे, प्राजक्ता दळवी, किशोर मानकामे, अरविंद बिरमोळे, सतीश मोडक, प्रकाश तेलगोटे, अभिजित थर्वळ, शाम चौगले, प्रकाश खाडे, सचिन जोशी, लता नाटलेकर, ममता घाडीगांवकर आदी सह शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.