Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

भाजप नेते किरीट सोमय्यांना मोठा झटका; मुंबई उच्च न्यायालयाकडून न्यायालयीन चौकशीचे आदेश


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भाजप नेते किरीट साेमय्या यांची चाैकशी हाेणार असून किरीट साेमय्या यांची ही न्यायालयीन चाैकशी हाेणार आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. या याचिकेची न्यायालयाने दखल घेतली आहे.

राज्यात विराेधकांना जाणूनबुजून लक्ष्य केलं जात आहे. भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी ही माेहीम सुरू केली आहे. किरीट सोमैय्या आराेप करते आणि ‘ईडी’ चाैकशी करते. असा आराेप या याचिकेद्वारे करण्यात आला आहे.

हसन मुश्रीफ यांचे वकील आबाद पोंडा यांनी यासंदर्भात न्यायालयात जाेरदार युक्तिवाद केला हाेता. यात सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. राज्यात विरोधकांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे. भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांनी ही माेहीम उघडली आहे. ते तक्रार करतात आणि त्यानंतर ‘ईडी’ कारवाई करते, असे हे नियाेजनपूर्वक चालू आहे. यामागे राजकीय षड्यंत्र असल्याचा दावा वकील पोंडा यांनी केला. दरम्यान, आज याप्रकरणी झालेल्या सुनावणीच्यावेळी न्यायालयाने मुश्रीफ यांना दिलासा दिला. किरीट सोमैय्या यांच्या न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश दिले.

प्रकरण नक्की आहे काय ?

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या काेल्हापुरातील मालमत्तेवर ‘ईडी’ने छापेमारी केली. तसेच मुश्रीफ यांच्याविराेधात गुन्हा दाखल केला. हा गुन्हा हेतुपुरस्सर दाखल करण्यात आल्याचा आराेप मुश्रीफ यांनी केला आहे. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी मुश्रीफ यांनी याचिकेद्वारे केली आहे. गेल्या सात महिन्यांपासून वेगवेगळ्या घटनांचा विचार करता ‘ईडी’मध्ये अडकवण्याचे प्रकार हाेत आहेत. राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा हे षड्यंत्र असल्याचाही दावा हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *