मासूम शेख, अहमदपूर, प्रतिनिधी: मलेशिया येथील क्वालालंपूर येथे ऑलिंपिक कौन्सिल ऑफ मलेशिया द्वारा आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये, महाराष्ट्राकडून किलबिल नॅशनल स्कूल शाळेची विद्यार्थिनी कु. जान्हवी गणपतराव जाधव व वैभवी प्रशांत माने यांनी धडाकेबाज कामगिरी करत आपल्या देशाला रौप्य पदक मिळवून दिले. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पहिले पदक प्राप्त करून जान्हवीने आपली निवड सार्थ ठरवली आहे.
तिच्या या यशामध्ये छत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. दत्ता गलाले, संतोष कदम, प्रशांत माने, मोहसिन शेख,आकाश बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले.
त्याबद्दल संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, उप प्राचार्य धरमसिंग शिराळे कार्यालयीन अधिक्षक सचिन जगताप व क्रीडा विभागाच्या वतीने तीला शुभेच्छा देण्यात आल्या..!!