अहमदपूर:
मासूम शेख
तालुक्यातील सांगवी सु येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच संत तुकाराम नॅशनल मॉडेल्स स्कूल जलतरण तलाव हरंगुळ , लातूर येथे संपन्न झालेल्या पावसाळी जलतरण स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन करत शाळेचा धबधबा निर्माण केला. १४ वर्षे वयोगटात फ्रीस्टाइल पोहण्याच्या स्पर्धेत सूर्यवंशी रोहन दयानंद हा प्रथम आला असून याच वयोगटात बॅक स्ट्रोक 100 मीटर पोहण्याच्या स्पर्धेत सूर्यवंशी रोहन दयानंद हाच पुन्हा प्रथम आलेला आहे.१७ वर्षे वयोगटात फ्रीस्टाइल ८०० मीटर पोहण्याच्या स्पर्धेत चव्हाण बालाजी सुभाष द्वितीय आला असून याच वयोगटात याच स्पर्धेत राठोड अमोल अंगद हा तृतीय आलेला आहे. तर या वयोगटात 100 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये राठोड अमोल अंगद द्वितीय आला असून 200 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत चव्हाण बालाजी सुभाष प्रथम आलेला आहे. तर १९ वर्षे वयोगटात फ्रीस्टाइल १५०० मीटर पोहण्याच्या स्पर्धेत चव्हाण रामेश्वर विश्वनाथ प्रथम आला असून 100 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये चव्हाण रामेश्वर विश्वनाथ हा प्रथम आलेला आहे तर 19 वर्षे वयोगटात ४×१०० रिले स्पर्धेत अहिल्यादेवी चा चमू सर्वप्रथम आला आहे या चमूमध्ये चव्हाण रामेश्वर, चव्हाण बालाजी, राठोड अमोल, चव्हाण प्रदीप आणि चव्हाण आशिष या विद्यार्थ्यांनी सांघिक कार्य करत प्रथम क्रमांक पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्रशिक्षक रेड्डी प्रदीप यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील,संस्थेच्या सचिव तथा भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस प्राचार्य रेखा तरडे- हाके संस्थेच्या उपाध्यक्षा ॲड मानसी हाके, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, केंद्रप्रमुख रमाकांत खंदारे आदींनी अभिनंदन केले.