अहमदपूर :-
मासूम शेख
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग (म.रा.), राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने दि.6 आँगस्ट ते 31 सप्टेंबर 2023 या कालावधीत राज्यातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत सहा गट देण्यात आलेले होते.यात तालुकास्तर,जिल्हास्तर व राज्यस्तर असे शैक्षणिक दर्जेदार व्हिडिओ निर्मितीचा नुकतेच निकाल घोषित करण्यात आला आहे.यात यशवंत विद्यालयातील दोन शिक्षकांनी भरीव यश संपादन केले आहे.
यशवंत विद्यालय अहमदपूर जि.लातूर येथिल उपक्रमशील कलाशिक्षक महादेव खळुरे यांना 9-10 या गटातून सामाजिक शास्त्र विषयातील जिल्हातील द्वितीय पुरस्कार जाहिर झाला आहे. उपक्रमशील सहशिक्षक रामलिंग दत्तापूर यांना 9-10 वी गटातील भाषा विषयात अहमदपूर तालुक्यातील सर्वप्रथम लातूर जिल्ह्यातून सर्व तृतीय पुरस्कार जाहिर झाला आहे.
यशाबद्दल संस्थेचे सचिव डी.बी.लोहारे गुरुजी,अध्यक्ष डॉ.अशोकराव सांगविकर,उपाध्यक्ष डाँ भालचंद्र पैके,उपसचिव डॉ.सुनिताताई चवळे,मुख्याध्यापक गजानन शिंदे,उप मुख्याध्यापक माधव वाघमारे,पर्यवेक्षक शिवाजी सूर्यवंशी ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधूनी अभिनंदन केले.