अहमदपूर :-
मासूम शेख
सकल ओबीसी, अल्पसंख्याक, भटक्या,दलीत, बहुजन समाजाचा अहमदपूर विधानसभा मतदारसंघात सर्वपक्षीय एकच उमेदवार म्हणून अॅड. भारत चामे यांच्या नावाची घोषणा पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली.
अहमदपूर व चाकूर तालुक्यातील सर्वराजकीय पक्षातील सकल ओबीसी समाज बांधवांच्या अनेक व्यापक बैठका झाल्यानंतर आज कोअर कमिटीची बैठक क्राइस्ट इंग्लिश स्कूल मध्ये घेण्यात आली. सदरील कोअर कमिटीनी इच्छुक उमेदवार माजी आमदार बब्रुवान खंदाडे,गणेश दादा हाके, अॅड.भारत चामे,अॅड.माधवराव कोळगावे यांच्या मुलाखती घेतल्या उमेदवारी बद्दल कोअर कमिटी मध्ये एकमत होत नसल्याने इच्छुक उमेदवारांच्या सहमतीने कोअर कमिटीच्या सदस्यांचे गुप्त मतदान घेण्यात आले.मतपत्रीकेची मोजणी सर्वांसमक्ष करण्यात आली.त्यामध्ये अॅड. भारत चामे यांना सर्वाधिक मतदान मिळाल्यामुळे अॅड.भारत चामे यांचे नाव अहमदपूर येथील जिजाऊ फंक्शन हाॅल मध्ये पत्रकार परिषद घेऊन घोषित करण्यात आले.
सकल ओबीसी, अल्पसंख्याक,विमुक्त भटक्या,दलीत ,बहुजन समाजाचा अहमदपूर, चाकुर तालुक्यातील सर्व पक्षीय अपक्ष उमेदवार म्हणून अॅड.भारत चामे यांच्या नावाची घोषणा कोअर कमिटीच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
सदरील कोअर कमिटीच्या बैठकीस माजी आमदार बब्रुवान खंदाडे, गणेश दादा हाके पाटील,डॉ.अशोक सांगवीकर,एन. आर. पाटील, भारत रेड्डी, जिवणकुमार मद्देवाड, अॅड. भारत चामे,सांब महाजन, अशोक काका केंद्रे,त्रंबक आबा गुट्टे,किशोर मुंडे, अॅड.माधवराव कोळगावे, बालाजी रेड्डी,
चंद्रकांत मद्दे, नितीन रेड्डी,गंगाधर केराळे,श्रीकांत बनसोडे,सज्जन लोणाळे गोविंद गिरी,मधुकर मुंडे,मार्शल माने, शंकर चाटे, सुरेश मुंडे, हणमंत देवकते, माणीक नरवटे, पंडित पवार, सलीम तांबोळी, आत्माराम डाके
यांच्या सह अहमदपूर व चाकूर तालुक्यातील सर्वपक्षीय सकल ओबीसी,अल्पसंख्याक,भटक्या,दलीत, बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचे आभार गोविंद गिरी यांनी मानले