अहमदपूर:-
मासूम शेख
येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आधुनिक भारताचे शिल्पकार तथा पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर हे होते तर चंद्रकांत धुमाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे सहसंयोजक डॉ. संतोष पाटील यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.