अहमदपूर:-
मासूम शेख
येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने मराठवाडा साहित्य परिषदेच्या निमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक मोहिब कादरी यांचा प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी सत्कार करून पुढील साहित्यिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मराठीतील ज्येष्ठ लेखक मोहिब कादरी यांनी मराठी साहित्यामध्ये दिलेल्या विविध वाड्.मयातील कसदार लेखनाची व योगदानाची दखल घेऊन मराठवाडा साहित्य परिषदेच्या निमंत्रक सदस्यपदी त्यांची एकमताने नुकतीच निवड झाली आहे.
या निवडीबद्दल मराठी साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक व साहित्यिक तथा महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी मोहिब कादरी यांचा यथोचित सत्कार करून पुढील साहित्यिक व मसापच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी संतसाहित्याचे अभ्यासक प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे, डॉ. सतीश ससाणे, डॉ. पांडुरंग चिलगर, प्रशांत डोंगळीकर, हुसेन शेख , शिवाजी चोपडे यांच्यासह मराठी भाषा व साहित्यावर प्रेम करणारे बहुसंख्य मित्र मंडळी उपस्थित होते