Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

*आंतरराष्ट्रीय तलवारबाजी पट्टू साईप्रसाद जंगवाड यांचा यशवंत विद्यालयात सत्कार संपन्न*

अहमदपूर :-
मासूम शेख

येथील यशवंत विद्यालयात दहावी मध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी साईप्रसाद संग्राम जंगवाड यांनी यावर्षी चार राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत, तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत, जागतिक पातळीवर सहभाग नोंदवला.
न्यूझीलंड येथील कॉमनवेलथ स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत कांस्यपदक मिळविले. त्याबद्दल 2023 24 यावर्षीचा लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा समिती मार्फत त्याला गुणवंत क्रीडा पुरस्कार नुकताच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लातूरचे पालकमंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले आणि जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर घुगे यांच्या उपस्थितीत त्यांना लातूर येथे शासकीय ध्वजारोहणाच्या सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
या नेत्रदीपक यशाबद्दल टागोर शिक्षण समितीचे सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी यांच्या हस्ते शालेय प्रार्थनेमध्ये साईप्रसाद जंगवाड यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
साईप्रसाद जंगवाड याला विभाग प्रमुख संतोष कदम, दीपक हिंगणे, प्रभावती मिरजकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.
या यशाबद्दल त्यांचे डॉ. अशोकराव सांगवीकर, उपाध्यक्ष डॉक्टर भालचंद्र पैके, सहसचिव डॉक्टर सुनिता चवळे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रा. दत्ताभाऊ गलाले, प्राचार्य गजानन शिंदे, उप मुख्याध्यापक माधव वाघमारे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *