Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

**शिक्षण महर्षी डी.बी.लोहारे गुरुजी यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा.* *लोहारे गुरुजी यांचे कार्य शैक्षणिक क्षेत्रात प्रेरणादायी*- *माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांची प्रतिपादन*

अहमदपूर:-
मासूम शेख

महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याप्रमाणे आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षण महर्षी डी.बी. लोहारे गुरुजी यांचे कार्य पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे आणि त्याचा सर्वांनी आदर्श घ्यावा असे आग्रही प्रतिपादन लोकनेते तथा माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी केले.
ते दि.12 रोजी यशवंत विद्यालयात आयोजित शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात सत्कार प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी, माजी मंत्री विनायकराव पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, माजी सभापती आर डी शेळके, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोकराव सांगवीकर, उपाध्यक्ष डॉक्टर भालचंद्र पैके, एस एस एम प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा कवी अनिल मुळे,सचिव प्राध्यापक डॉक्टर सुनिता चवळे, एडवोकेट प्रकाश चवळे, सिद्धी शुगरचे एम.डी.पी.जी. होनराव , जि प चे माजी अध्यक्ष ज्ञानोबा घुमंनवाड, प्राचार्य गजानन शिंदे, कमलाकर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष रोडगे, संचालक शिवाजीराव पाटील, राम बेल्लाळे,राहुल शिवपुजे, बाबासाहेब देशमुख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी आचार्य गुरुराज स्वामी म्हणाले की शिक्षण महर्षी डी बी.लोहारे गुरुजी यांनी जीवनभर शैक्षणिक क्षेत्रात कर्मयोगी सारखे काम केले असून कामामुळे माणूस मोठा होतो. त्यामुळे तरुणांनी सकारात्मक काम करावे असे आवाहन केले.
यावेळी प्राध्यापक डॉक्टर सुनिता चवळे, डॉक्टर भालचंद्र पैके, कवी अनिल मुळे यांचे मनोगत पर भाषणे झाली.
प्रास्ताविक माधव वाघमारे, यांनी सूत्रसंचालन कपिल बिराजदार यांनी तर आभार राम तत्तापूरे यांनी मांनले.
यावेळी सत्कार संयोजन समितीच्या वतीने शिक्षण महर्षी डी.बी. लोहारे गुरुजी व पुष्पाताई लोहारे यांचा शाल श्रीफळ पुष्पहार स्मृतीचिन्ह, भर आहेर देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राचार्य रामलिंग मुळे, प्राचार्य अशोक पेदेवाड, प्राचार्य व्ही बी गंपले, मुख्याध्यापक रवी साकोळकर, मुख्याध्यापक राजकुमार घोटे, उपप्राचार्य प्राध्यापक मुजमिल सय्यद, मुख्याध्यापक राजेश्वर पारशेटे, मुख्याध्यापक रमेश जटाळ, मुख्याध्यापक दत्तात्रय तुंमराम, मुख्याध्यापक एस बी फड, एस एस एम प्रतिष्ठानचे प्राचार्य डॉक्टर दिलीप मुगळे, सोमनाथ स्वामी, आशा रोडगे, कलावती भातंबरे,शरण चवंडा यांच्यासह मान्यवरां ची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजकुमार पाटील, बालाजी सोनटक्के, प्रा विश्वंभर स्वामी, प्रा.शिवशंकर पाटील, श्रीधर लोहारे, मनोहर ढेले, गुरप्पा बावगे, डॉक्टर शरद करकनाळे यांच्या संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *