अहमदपूर:-
मासूम शेख
येथील किलबिल नॅशनल स्कूल जवळगा या शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त चमत्काराचे सादरीकरण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक हरिदास तम्मेवार उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागा करण्यासाठी व विज्ञानातून शिक्षण देण्यासाठी कोणकोणत्या पद्धतींचा वापर केला पाहिजे याबद्दल सरांनी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमात चमत्काराच्या सादरीकरणातून एकूण दहा प्रयोगांचे सादरीकरण केले व त्याची वैज्ञानिक कारण कोणते याचाही खुलासा केला सध्या समाजामध्ये अंधश्रद्धेचा पगडा कमी करण्यासाठी प्रयत्नशील असलेले हरिदास तम्मेवार आजही वेगवेगळ्या शाळांना भेट देत आपले कार्य अविरतपणे करत आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संतोष पाटील यांनी केले तर सूत्र संचलन महारुद्र वाघमारे यांनी केले.
कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.