“राष्ट्रीय एकता” दिनानिमित्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले “मानवी एकता साखळीचे” आयोजन 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचाराविरुद्ध दक्षता जनजागृती सप्ताह करण्यात येणार साजरा – आयुक्त दिलीप ढोले मिरा भाईंदर, प्रतिनिधी: संपूर्ण देशात 31 ऑक्टोबर रोजी थोर स्वातंत्र्य सैनिक व भारताचे पहिले गृहमंत्री स्वर्गीय सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी केली जाते. या Read More…
Month: October 2022
‘भारत जोडो’ यात्रेच्या समर्थनार्थ मिरा भाईंदर शहरात काँग्रेसची बाईक रॅली संपन्न!
मिरा भाईंदर, प्रतिनिधी: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत सुरू असलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेला देशभरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून ही ‘भारत जोडो’ यात्रा तेलंगाणा मधून ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येत असून देगलूर, नांदेड येथे प्रवेश करणार आहे. या निमित्ताने मिरा भाईंदर शहरातील काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या Read More…
सज्ञान मुलींना त्यांच्या मर्जीने विवाह करण्याचा अधिकार हा त्यांचा मूलभूत हक्क; दिल्ली उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत दिल्ली उच्च न्यायालयाने लग्नआणि सज्ञान मुलींचा अधिकार (राईट टू मॅरी) या संबंधित एक महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे. सज्ञान मुलींना त्यांच्या मर्जीने विवाह करण्याचा पूर्ण हक्क असून तो त्यांचा घटनात्मक हक्क असल्याचं दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. आपल्या मर्जीने विवाह करणे हा सज्ञान मुलींच्या खासगी स्वातंत्र्याचा भाग असून तो Read More…
१८ हजार जागांसाठी राज्यात होणार पोलीस भरती..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासनाकडून पोलीस भरतीचा जीआर काढण्यात आला आहे. शासनाच्या जीआरमुळे तब्बल ११ हजार ४४३ पदं भरली जाणार आहेत. महाराष्ट्र पोलिसांची रिक्त असलेली १०० टक्के पदं भरण्याला मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई संवर्गामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक Read More…
बाळासाहेबांच्या शिवसेनेने केला डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शाखेवर कब्जा..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवलीतील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवर आज बाळासाहेबांच्या शिवसेनेने अखेर कब्जा मिळवला. गेल्या काही महिन्यांपासून शिंदे आणि ठाकरे गटामध्ये या शाखेच्या ताब्यावरून वाद सुरू होता. शिंदे गटाचे माजी नगरसेवक तथा शहरप्रमुख राजेश मोरे यांनी ही शाखा शिंदे गटाने आपल्या ताब्यात घेतली असल्याचे स्पष्ट केले आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव Read More…