Latest News गुन्हे जगत देश-विदेश महाराष्ट्र

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मराठी कलाकार मयुरेश कोटकर याला अटक

संपादक: मोईन सय्यद / मुंबई प्रतिनिधी: मिलन शाह राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मराठी कलाकार मयुरेश कोटकर याला ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. मयुरेशला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली होती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी Read More…

Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

उत्तर मुंबईत पहिल्यांदाच ‘अँटीबॉडी कॉकटेल’ थेरपीद्वारे कोविड-१९ रूग्णांवर उपचार
मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयानं वाचवले कोरोनाबाधित रूग्णांचे प्राण

संपादक: मोईन सय्यद/मीरारोड प्रतिनिधि मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयात कोविड-१९ ची हलक्या-मध्यम स्वरूपातील लक्षणं असणाऱ्या रूग्णांना ‘अँटीबॉडी कॉकटेल’ उपचार दिले जात आहे. त्यानुसार कोविड-१९ विषाणूची लागण झालेल्या दोन रूग्णांवर ‘मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल’ थेरपीद्वारे उपचार करण्यात आले असून उत्तर मुंबईत पहिल्यांदाच कोरोना रूग्णांवर या नवीन उपचारपध्दतीने या संसर्गावर मात करण्यात आली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रूग्णांसाठी Read More…

Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

शैक्षणिक कर्जासाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत आता ८ लाख रुपयांपर्यंत वाढ

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेकरिता आता विद्यार्थ्याच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली. आतापर्यंत ही उत्पन्न मर्यादा वार्षिक अडीच लाख रुपये इतकी होती. आता उत्पन्न मर्यादा वाढविल्याने जास्तीत जास्त अल्पसंख्याक विद्यार्थी Read More…

आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

संस्थापक संतोष भगत यांनी केले स्वखर्चातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत अबोली महिला रिक्षा संघटनेच्या वतीने रिक्षा चालक महिलांना जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करण्यात आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन सुरु आहे. अशामध्ये सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढच होताना दिसत आहे. लॉक डाऊनमुळे असलेले उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झालेले आहेत. यामध्ये महिला रिक्षाचालकांवरही मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. अबोली महिला रिक्षा चालक Read More…

Latest News देश-विदेश महाराष्ट्र

‘मुलींना मोबाइल देऊ नका, फोनवर बोलतात अन् मुलांबरोबर पळून जातात’ युपी महिला आयोगाच्या सदस्याचे वादग्रस्त विधान

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत उत्तर प्रदेशातील राज्य महिला आयोगाच्या सदस्या मीना कुमारी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. मीना कुमारी यांचे हे वक्तव्य मुलींशी संबंधित असून यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. मुली मोबाइलवर तासनतास बोलत असतात, त्यामुळे मुलींना मोबाइल देऊ नये, असे विधान मीना कुमारी यांनी केलंय. त्यांनी असेही म्हटले आहे की जर Read More…