अहमदपूर:- मासूम शेख जगातल्या विद्वानांच्या अभ्यासाचा विषय बनलेल्या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये राजमाता जिजाऊंचे मोठे योगदान असून, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची खरी प्रेरणा जिजाऊंनी दिली, असे स्पष्ट प्रतिपादन इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. संतोष पाटील यांनी केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राजमाता जिजाऊ व स्वामी Read More…
*अहमदपुरच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे ‘दक्षिण भारत अभ्यास’ अभियान*
अहमदपूर:- मासूम शेख येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने सहल प्रमुख डॉ. किरण गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण भारताच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक भौगोलिक वैभवांसह इतर घटकांचा अभ्यास करण्यासाठी ‘ दक्षिण भारत अभ्यास’ अभियान मोहिमेचा प्रारंभ प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी या अभियानास हिरवा झेंडा दाखवून केला. या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य Read More…
*किलीबल नॅशनल स्कूल येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी*
अहमदपूर:- मासूम शेख तालुक्यातील जवळगा येथील किलबिल नॅशनल स्कूल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, उप प्राचार्य धर्मसिंग यांच्यासह सावित्रीबाई फुले यांच्या भुमिकेमध्ये शाळेच्या शिक्षिका, अंजली भंडारे, स्वाती कुमठेकर, संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. ज्ञानोबा भोसले पुढे बोलताना म्हणाले, की 18 Read More…
*यशवंत विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्सव उत्साहात साजरा* *समाजाने सावित्री ज्योतीचा आदर्श घ्यावा* *पुष्पाताई लोहारे यांचे प्रतिपादन*
अहमदपूर:- मासूम शेख अनादी काळापासून स्त्रियांना आदिशक्ती मानले जाते. स्त्री ही सृजनशील आणि नवनिर्मितीची प्रणेती आहे म्हणून समाजाने सर्व स्तरातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा आदर्श घेऊन जीवन दीपस्तंभ प्रमाणे बनवावे असे प्रतिपादन शांतिनिकेतन सहकारी पतसंस्थेच्या माजी अध्यक्षा पुष्पाताई लोहारे यांनी केले . त्या यशवंत विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सवाच्या निमित्ताने Read More…
*एम्स (AIIMS)भोपाळ येथून डॉ .प्रणव तत्तापुरे एम बी बी एस परीक्षा उतीर्ण*
अहमदपूर :- मासूम शेख मध्य प्रदेशाची राजधानी असलेल्या भोपाळ येथील अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्थान, भोपाळ च्या वतीने माहे नोव्हेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या एम बी बी एस च्या फायनल इयरच्या परीक्षेत डॉ. प्रणव रामलिंग तत्तापूरे यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. कालच त्याचा निकाल घोषित करण्यात आला असून त्यामध्ये 1456 गुण घेऊन यशस्वी झाला आहे. Read More…