पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या! मिलन शाह, प्रतिनिधि : पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आज सायंकाळच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नाना हंडाळ (वय ४०) असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात ते पोलीस नाईक पदावर कार्यरत होते. या प्रकरणी प्राथमिक माहिती अशी Read More…
Tag: crime
लोखंडी रॉडने मारहाणीत जखमी झालेल्या पतीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची पत्नीची मागणी!
मीरारोड, प्रतिनिधी : मीरारोड पूर्वेकडील मीरा गावठण भागात राहाणाऱ्या शंभू जाधव नावाच्या इसमाचा गेल्या २६ ऑक्टॉबर रोजी त्याच्या राहत्या घरी संशयास्पद रित्या मृत्यू झाला. याबाबत त्याची पत्नी सुरेखा शंभू जाधव हिने काशिमीरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन माझ्या पतीचा खून झाला असून खून त्याचाच सख्खा भाऊ दीपक जाधव त्याची पत्नी गुलाब दीपक जाधव आणि आणखीन Read More…
अनधिकृत बॅनर काढण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून हल्ला करणाऱ्या दोघांवर नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
मिरारोड, प्रतिनिधी : मिरारोड पूर्वेकडील नयानगर येथील गंगा कॉम्प्लेक्स परिसरातील अनधिकृतपणे लावण्यात आलेले बॅनर काढण्यासाठी गेलेले महापालिकेचे प्रभाग अधिकारी आणि कर्मचारी यांना धक्कामुक्की करून आणि शिवीगाळ करत धमावुन सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात अमनशक्ती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अब्दुल रहमान मकबूल हुसेन शेख उर्फ रहमान कालिया आणि ट्रस्टचे सेक्रेटरी सलीम अजमुद्दीन शेख नावाच्या Read More…
चार वर्षाच्या मुलीचा बलात्कार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न! नराधम आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
भाईंदर, प्रतिनिधी : भाईंदर पश्चिमेकडील भोला नगरमध्ये एका चार वर्षांच्या मुलीचे बसमधून अपहरण तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून आरोपीने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला ठार मारण्याच्या उद्देशाने एका पोत्यामध्ये बांधून रस्त्याच्या कडेला फेकून दिले. मात्र पोलिसांनी अत्यंत्य जलदगतीने तपासाची सुत्रे फिरवून नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलगी सध्या जिवंत असली तरी तरी Read More…
मिरा- भाईंदरमध्ये भराव माफियांच्या धुमाकुळीकडे महसूल अधिकारी, पालिका – पोलिसांसह राजकारण्यांची “अर्थपूर्ण” डोळेझाक
मिरा-भाईंदर, प्रतिनिधी : मिरा- भाईंदर शहरामध्ये भराव माफियांनी धुमाकूळ घातला असून राजरोसपणे सीआरझेड, कांदळवन, नैसर्गिक पाणथळ व ना-विकास क्षेत्रात देखील भराव सुरु आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होऊन शहर बुडण्याचा धोका वाढला असताना महापालिका, पोलिसांसह राजकारणी नगरसेवक आणि महसूल विभागा कडून मात्र ह्या गंभीर प्रश्नी अर्थपूर्ण रित्या डोळेझाक सुरु आहे. महापालिकेचे रस्ते – पदपथ व अन्य बांधकाम Read More…