महाराष्ट्र

मनसेच्या पुणे शहराध्यक्षा रुपाली ठोंबरे, नगरसेवक सचिन चिखलेसह मनसेच्या ३५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल!

मनसेच्या पुणे शहराध्यक्षा रुपाली ठोंबरे, नगरसेवक सचिन चिखलेसह मनसेच्या ३५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल! मिलन शाह, चाकण, पुणे : महाळुंगे येथील एका कंपनीने काही कामगार कमी केले. तसेच काहींना दुसऱ्या प्लांटमध्ये बदली केले. याला विरोध करत मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्व कामगारांना महाळुंगे येथील कंपनीतच कामावर ठेवण्याच्या मागणीसाठी कोरोना काळात बेकायदेशीरपणे मोर्चा काढला. याबाबत मनसे शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, Read More…

आपलं शहर

डी मार्टच्या लिफ्टमध्ये अडकले 15 जण अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखून केली सुटका!

मीरा भाईंदर, प्रतिनिधि: भाईंदर पश्चिमेकडील 150 फूट रोड वर असलेले डी मार्टच्या लिफ्टमध्ये रविवारी संध्याकाळी 7.45 वा च्या सुमारास अचानक 15 नागरिक अडकल्याने एकच खळबळ उडाली होती. परंतू मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखून अडीच तास अथक प्रयत्न करून रात्री 10 वाजता नागरिकांना सुरक्षित बाहेर काढल्या नंतरच सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. भाईंदर पश्चिमेकडे Read More…

गुन्हे जगत

पुणे-सोलापूर रस्त्यावर बर्निंग बसचा थरार! बस चालकाच्या समयसूचकतेमुळे प्रवासी बचावले!

मिलन शाह, लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर येथील मनाली हॉटेलसमोर सकाळी आठच्या सुमारास एका खासगी बसला आग लागली. चालकाच्या समयसुचकतेमुळे सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान पुणे महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या अग्निशमन दलांच्या जवानांनी तातडीने आग विझवली. सकाळी सोलापूरच्या दिशेने सुसाट जाणाऱ्या खासगी प्रवासी Read More…

आपलं शहर

भाईंदर पूर्वेकडील नवघररोडवर ओमसाई गेस्ट हाऊसमध्ये लागली भीषण आग! अग्निशमन दलाने प्रसंगावधान राखून आटोक्यात आणली आग

भाईंदर, प्रतिनिधी : भाईंदर पूर्वेकडील नवघररोडवर असलेल्या भाजपचे माजी नगरसेवक यशवंत कांगणे यांच्या ओमसाई गेस्ट हाऊस या हॉटेलमध्ये काल रात्री उशिरा अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण अजून समजले नसले तरी विजेच्या तारेमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे Read More…