Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

गावठाणापासून 200 मीटरच्‍या आतील जमीन मालकांना अकृषिक परवानगीची आवश्‍यकता नाही – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड : जमिनीच्‍या अकृषिक वापरासाठी आवश्‍यक परवानगीच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि कार्यप्रणालीत सुलभता आणण्‍यासाठी शासनाने महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 42-ब, 42-क, 42-ड समाविष्‍ट केले आहे. या कलमान्‍वये अकृषिक आकारणी व रूपांतर कर भरणा केलेले चलन किंवा पावती ही विकास योजनेत दर्शविलेल्या वापरामध्‍ये अकृषिक झाल्‍याचे पुरावा म्‍हणून ग्राहय धरण्‍यात येईल. त्‍याबाबतीत आणखी कोणताही Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अखेर जिल्हाध्यक्ष बदलला! अरुण कदम यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती!

मिरा भाईंदर: मिरा भाईंदर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अखेर मोठा संघटनात्मक फेरबदल करण्यात आला असून जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांची तडकाफडकी हकालपट्टी करून अरुण कदम यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी आज अरुण कदम यांना आज जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देऊन पक्षाची जबाबदारी सोपवली. चार वेळा Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

‘इको सेन्सिटिव्ह’ झोनमध्ये शेकडो झाडांची कत्तल करून स्वतःचा ‘विहंग’ विकास करणार आमदार प्रताप सरनाईक?

मिरा भाईंदर: शिवसेनेचे आणि पर्यायाने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे लाडके आमदार प्रताप सरनाईक येनकेन प्रकारेण कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत राहत असतात. अशाच प्रकारे आता देखील आमदार प्रताप सरनाईक पुन्हा चर्चेत आले आहेत मात्र यावेळेस चर्चा आहे ती त्यांच्या आलिशान बंगल्याच्या प्रकल्पासाठी शेकडो झाडांच्या कत्तलीची. मिरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्रातील मौजे चेने, सर्वे Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

अनेक वर्षांपासून रखडलेल्या अधिकाऱ्यांची पदोन्नती झाल्यामुळे “कहीं खुशी, कहीं गम” सारखी अवस्था!

मिरा भाईंदर: तब्बल अठरा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मिरा भाईंदर महापालिकेच्या दहा कनिष्ठ अभियंत्यांना शाखा अभियंता पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. त्याच बरोबर अग्निशमन विभागाचे सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी प्रकाश बोऱ्हाडे, दिलीप रणवरे, धनंजय कनोजे यांना देखील अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे मात्र आणखीन चार अभियंत्यांना पदोन्नती पासुन वंचित राहावे लागले आहे. इतर Read More…

Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या

बनावट करारनामा करून ज्येष्ठ नागरिकाचा गाळा हडप करणाऱ्या सहा जणां विरुद्ध काशिमीरा पोलिसांनी केला गुन्हा दाखल!

संपादक: मोईन सय्यद/मिराभाईंदर प्रतिनिधी मिरा भाईंदर: मुंबईत राहणाऱ्या एका ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा गाळा हडपण्यासाठी बळजबरी कब्जा करुन मृत व्यक्ती सोबतचा बनावट नोटरी करारनामा दाखवून पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने स्वतःच्या नावे कर आकारणी करून घेत ज्येष्ठ नागरिकालाच विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी ५ महिलांसह ६ जणां विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. Read More…