Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

मिरा-भाईंदर शहरात लवकरच धावणार वातानुकूलित इलेक्ट्रिक बस! आयुक्त दिलीप ढोले यांनी प्रवास करून घेतली बसची चाचणी

मिरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन सेवेच्या ताफ्यात लवकरच सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज आणि पर्यावरण पूरक 45 इलेक्ट्रिक बस गाड्या दाखल होणार! – दिलीप ढोले, आयुक्त मिरा-भाईंदर, प्रतिनिधी: मिरा भाईंदर शहरातील नागरिकांना आरामदायी व सोयी सुविधांनी सज्ज अशी परिवहन सेवा देण्याचा प्रयत्न मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासन नेहमीच करत आले आहे. त्या अनुषंगाने परिवहन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी व शहरातील Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

“इंडियन स्वच्छता लीग” स्पर्धेच्या 1800 शहरांमध्ये मिरा भाईंदर महानगरपालिका महाराष्ट्रात प्रथम!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: स्वच्छ अमृत महोत्सव अभियान अंतर्गत केंद्र शासन व राज्य शासनाच्या सूचनांना अनुसरून दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी मिरा भाईंदर महानगरपालिकामार्फत शहरवासीयांच्या सहभागाने “इंडियन स्वच्छता लीग” अंतर्गत स्वच्छता लीग रॅली मोहीम यशस्वीरीत्या संपन्न करण्यात आली. “इंडियन स्वच्छता लीग” स्पर्धेमध्ये मिरा भाईंदर महानगरपालिकेस महाराष्ट्रात 3 लाख ते 10 लाख लोकसंख्या गटामध्ये प्रथम क्रमांकाने मानांकित Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

शहराच्या रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत आयुक्तांचे आदेश!

खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे आयुक्त दिलीप ढोले यांचे अधिकाऱ्यांना निर्देश! मिरा भाईंदर प्रतिनिधी: सोमवार 19 सप्टेंबर रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त दिलीप ढोले यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अभियंत्यांची आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीस शहर अभियंता दिपक खांबित, उप अभियंता, शाखा अभियंता व सर्व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते. मागील Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

“इंडियन स्वच्छता लीग” अंतर्गत आयुक्त दिलीप ढोले यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता लीग रॅली यशस्वीरीत्या संपन्न!

इंडियन स्वच्छता लीग” स्वच्छता मोहिमेत ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून अभिनेत्री मुग्धा गोडसे व अभिनेता राहुल देव यांच्या उपस्थितीने उत्साही वातावरण मिरा भाईंदर, प्रतिनिधी: संपूर्ण देशात स्वच्छ अमृत महोत्सव साजरा केला जात असून केंद्र शासन व राज्य शासनाच्या सूचनेनुसार 17 सप्टेंबर रोजी मिरा-भाईंदर महानगरपालिके तर्फे शहरवासीयांच्या सहभागाने “इंडियन स्वच्छता लीग” अंतर्गत स्वच्छता लीग रॅली मोहीम यशस्वीरीत्या संपन्न Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

महानगरपालिकेच्या उत्कृष्ट नियोजनामुळे अनंत चतुर्दशी विसर्जन सोहळा शांततेत संपन्न!

एकूण 2063 गणेश मूर्तींचे विसर्जन तर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी विसर्जन स्थळांना भेट देऊन जातीने लक्ष देऊन केली पाहणी! मिरा-भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील पारंपारिक विसर्जन स्थळांसोबतच शहरात विविध ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या 3 कृत्रिम विसर्जन स्थळांवर तसेच नैसर्गिक तलाव/समुद्रात आणि मुर्ती स्वीकृती केंद्रांवर एकूण 2063 गणेश मूर्तींचे विसर्जन व्यवस्थितरित्या व शांततेत पार पडले. Read More…