Latest News ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

BREAKING NEWS! माजी मंत्री बाबुल सुप्रियोंचा राजकारणातुन संन्यास; खासदारकीही सोडणार.. भाजपला मोठा धक्का!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत माजी केंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगालचे मोठे नाव असलेले भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी राजकारणाला रामराम ठोण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून त्यांनी “मी राजकारणात केवळ समाज सेवेसाठी आलो होतो व आता मी माझा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे” असे म्हणत राजकारणाबरोबरच खासदारकीही सोडण्याची घोषणा केली आहे. Read More…

आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये लसीकरणाच्या वादतून जोरदार हाणामारी; हाणामारी ची घटना सीसीटीव्हीत कैद..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत लसीकरणाच्या वादतून भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही घटना बदलापूर-कुळगाव नगर पालिकेच्या दुबे रुग्णालयात घडली. हा हाणामारीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. राजकीय श्रेयातून हाणामारी काही महिन्यांत बदलापूर कुळगाव नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर बदलापूर शहरात सध्या लसीकरण केंद्रांवर सर्वच राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळते आहे. सेना- भाजप Read More…

आपलं शहर

आजीवन काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेला मिरा-भाईंदर शहरातील काँग्रेसचा आधारस्तंभ हरवला!

भाईंदर, प्रतिनिधी : मिरा-भाईंदर शहरात राजकीय पटलावर अगदी सरपंच पदापासून अनेक पदं भूषविलेले काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, महानगरपालिकेचे माजी महापौर तुळशीदास दत्तू म्हात्रे यांचे दिर्घ आजारामुळे मंगळवार 01 डिसेंबर रोजी निधन झाले आहे. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मिरा-भाईंदर शहराच्या कॉंग्रेसमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस Read More…

आपलं शहर

भाजपच्या नाराजांच्या ‘ए’ ग्रुपचे प्रमुख ऍड रवी व्यास यांनी घेतली राष्ट्रवादीच्या माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांची भेट!

मिरा-भाईंदर, विशेष प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरातील भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता हटाव आणि भाजपा व शहर बचाव अशी मोहीम छेडणाऱ्या भाजपातील प्रमुख नगरसेवक – पदाधिकाऱ्यां पैकी एक असलेले नगरसेवक ऍड रवी व्यास यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि सध्या शिवसेनेत असलेले माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांची भेट घेतल्याने शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून Read More…