Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अखेर जिल्हाध्यक्ष बदलला! अरुण कदम यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती!

मिरा भाईंदर: मिरा भाईंदर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अखेर मोठा संघटनात्मक फेरबदल करण्यात आला असून जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांची तडकाफडकी हकालपट्टी करून अरुण कदम यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी आज अरुण कदम यांना आज जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देऊन पक्षाची जबाबदारी सोपवली. चार वेळा Read More…

Latest News आपलं शहर देश-विदेश महाराष्ट्र

कोकण वृत्तसेवेचे पत्रकार निसार अली यांना मंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते उत्कृष्ट शोध पत्रकारिता पुरस्कार!

मुंबई: कोकण वृत्तसेवेचे पत्रकार निसार अली सफदर अली सय्यद यांना राज्याचे मंत्री व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते उत्कृष्ट शोध पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जागृत महाराष्ट्र या मराठी वृत्तवहिनीच्या तिसऱ्या वर्धापन दिना निमित्त दिनांक 15 मे रोजी मालाड पश्चिमेतील ग्रीन व्हिलेज रिसॉर्ट या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात मुंबईचे Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

परिचारिका दिनानिमित्त वोक्हार्ट रूग्णालया तर्फे परिचारिकांचा सोन्याची नाणी देऊन सत्कार!

मिरा भाईंदर: आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे औचित्य साधून मिरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालया तर्फे परिचारिकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ३५ ते ४० परिचारिका सहभागी झाल्या होत्या. रूग्णांची सेवा करण्यासाठी परिचारिकांची भूमिका महत्त्वाची असते. त्या रूग्णाच्या गरजा ओळखून त्यांच्या आरोग्याची पुरेपुर काळजी घेतात. वेळप्रसंगी रूग्णांना मानसिक आधार देण्याचं काम देखील या परिचारिका करताना दिसतात. Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

‘इको सेन्सिटिव्ह’ झोनमध्ये शेकडो झाडांची कत्तल करून स्वतःचा ‘विहंग’ विकास करणार आमदार प्रताप सरनाईक?

मिरा भाईंदर: शिवसेनेचे आणि पर्यायाने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे लाडके आमदार प्रताप सरनाईक येनकेन प्रकारेण कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत राहत असतात. अशाच प्रकारे आता देखील आमदार प्रताप सरनाईक पुन्हा चर्चेत आले आहेत मात्र यावेळेस चर्चा आहे ती त्यांच्या आलिशान बंगल्याच्या प्रकल्पासाठी शेकडो झाडांच्या कत्तलीची. मिरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्रातील मौजे चेने, सर्वे Read More…

Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

अनेक वर्षांपासून रखडलेल्या अधिकाऱ्यांची पदोन्नती झाल्यामुळे “कहीं खुशी, कहीं गम” सारखी अवस्था!

मिरा भाईंदर: तब्बल अठरा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मिरा भाईंदर महापालिकेच्या दहा कनिष्ठ अभियंत्यांना शाखा अभियंता पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. त्याच बरोबर अग्निशमन विभागाचे सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी प्रकाश बोऱ्हाडे, दिलीप रणवरे, धनंजय कनोजे यांना देखील अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे मात्र आणखीन चार अभियंत्यांना पदोन्नती पासुन वंचित राहावे लागले आहे. इतर Read More…