गुन्हे जगत

कोविड-१९ आजाराची खोटे निगेटिव्ह प्रमाणपत्र तयार करणाऱ्याला काशिमिरा पोलिसांनी केली अटक

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मीरा भाईंदर : सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातलेले असतानाच कोविड-१९ आजाराने ऍडमिट असलेल्या रुग्णांची नावे व आधार कार्डच्या साहाय्याने कोविड-१९ आजाराची खोटी निगेटिव्ह प्रमानपत्रे तयार करणाऱ्या एका इसमास काशिमीरा गुन्हे शाखा कक्ष-१ च्या पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मिळालेले वृत्त असे आहे कि, एस.आर.एल.लॅब, मिरारोड स्टेशन येथे काम Read More…

Latest News महाराष्ट्र

“येरा – गबाळ्याचे काम नोहे” – अजित पवारांचे फडणवीसांना चोख प्रत्युत्तर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होतेय. यानिमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यातच सरकार कधी बदलायचं हे माझ्यावर सोडा असं विधान त्यांनी केलंय. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. अजित पवार म्हणालेत, राजकारणात कोणी मित्र किंवा शत्रू नसतो. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणं म्हणजे खेळ Read More…

Latest News

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या १९ एप्रिलपासून होणाऱ्या परीक्षा आता जूनमध्ये..

प्रतिनिधी: अवधुत सावंत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. या परीक्षा आता येत्या जूनमध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक Read More…

गुन्हे जगत

मुलुंड पोलिसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत इसमास केले अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत मुलुंड येथे ऍक्टिव्हा मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत इसमास मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे मुलुंड पोलिसांनी सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एकूण २० ऍक्टिव्हा मोटार सायकल (अंदाजे कींमत ८,००,००० /- आठ लाख रुपये) हस्तगत करण्यात आल्या आहेत.