संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
योगगुरु रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यातील वाद शमण्यची चिन्हं काही दिसत नाही. अॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर टीकेचा भडीमार केल्यानं आय.एम.ए ने आक्षेप नोंदवत योगगुरु रामदेव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आय.एम.ए ने आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहीलं आहे. योगगुरु रामदेव यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
“योगगुरु रामदेव यांच्याकडून लसीकरणाबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. हे कुठेतरी थांबायला हवं. एका व्हि.डि.ओ त त्यांनी १० हजार डॉक्टर आणि १ लाख लोकं करोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेऊन मृत पावल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करावा”,
अशी मागणी आय.एम.ए ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पत्रात केली आहे.
आय.एम.ए च्या उत्तराखंड शाखेनेही योगगुरु रामदेव यांना नोटीस पाठवली आहे.
अब्रुनुकसानीसाठी १ हजार कोटींची भरपाई द्यावी लागेल,
असं या नोटीसीमध्ये सांगण्यात आलं आहे. अॅलोपॅथी औषधं आणि डॉक्टरांवर केलेल्या टीकेप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
जर १५ दिवसात माफी मागितली नाही, तर १ हजार कोटी रुपयांचा दावा ठोकला जाईल असं यात सांगण्यात आलं आहे.
लसींवरून केजरीवाल यांचा केंद्र सरकारवर निशाणा योगगुरु रामदेव यांनी एका व्हायरल व्हिडिओत कोरोनाच्या मृत्यूमागे अॅलोपॅथी कारण असल्याचं सार्वजनिकरित्या सांगितलं आहे.