संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजीराजे यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं. सर्व नेत्यांनी मराठा समजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली.
तीन-चार दिवस मी महाराष्ट्राचा दौरा केला. मराठा समाज किती अस्वस्थ, दु:खी आहे हे मी शरद पवारांना सांगितलं. मराठा समाजावर अन्याय होत आहे. मी सर्व परिस्थिती त्यांच्या कानावर घातली. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, नारायण राणे, अजित पवार अशा सर्वांनाच एकत्र आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती मी त्यांना यावेळी केली, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली.
मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे असं मी शरद पवारांना सांगितलं असून त्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांशीही चर्चा होणार आहे. त्यानंतर उद्या संध्याकाळी मुंबईत पत्रकार परिषद होईल, असं संभाजीराजेंनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितलं.