Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

क्रॉफर्ड मार्केट येथील मासळी बाजार ऐरोली येथे हळविल्याने उत्तनच्या मच्छीमारांचे होत आहे प्रचंड नुकसान!

संपादक: मोईन सय्यद/भाईंदर प्रतिनिधी

भाईंदर: भाईंदरच्या उत्तन कोळी लोकांचा मासळी बाजार क्रॉफर्ड मार्केट येथून हलवून एरोली स्टेशन पासून आठ किलो मीटर लांब हलविण्यात आले असून त्यामुळे उत्तनच्या मच्छीमारांचे अतोनात हाल तर होतच आहे शिवाय त्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान देखील होत आहे.

मासळी बाजार ऐरोली शहरापासून आठ किलोमीटर लांब अंतरावर हलविण्यात आल्यामुळे त्या ठिकाणी मासळी घेण्यासाठी ग्राहक खूप कमी प्रमाणात येतात.

या परिसरात कांदळवन आणि पाणथळ जमीन असल्यामुळे सर्वत्र पाणी आणि चिखल जमा होतो त्यामुळे मच्छीमारांना मासळी विकण्यासाठी खूपच अडचण येत आहेत.

या ठिकाणी मासळी विकण्यासाठी पत्र्याचे शेड देखील देखील नसल्यामुळे पावसाळ्यात मासळी खराब होऊ लागली आहे.

उत्तनच्या मच्छीमारांना आपली मासळी बाजारात विकण्यासाठी उत्तन ते ऐरोली आणि परत ऐरोली ते उत्तन असा किमान दहा ते बारा तासाचा कालावधी लागत आहे.

त्यामुळे याठिकाणी महिला शौचालय नसल्यामुळे त्यांची फारच गैरसोय होत आहे. शिवाय जी मासळी विकण्यासाठी हमाल जागा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असतात त्यासाठी हमाल शंभर रुपये प्रतिदिन घेत आहेत ही देखील एक प्रकारची लुटच आहे म्हणावी लागेल.

मासळीचा लिलाव करणाऱ्याला प्रत्येक कॅरेट मागे साढे तीन रुपये कमिशन दयावे लागतात. त्याशिवाय बर्फ़ाचा खर्च, टेम्पो भाडे, बोटीला डिझेल, खलाशी मेहनत आणि महिलांचे कष्ट हे सर्व वजाबाकी जोडली तर ज्या मासळीची किंमत एक हजार रुपये होणार तिथे फक्तं दोनशे रुपये प्रति कॅरेट होते आहे.

त्यामुळे मच्छीमारांना बोटी समुद्रात जाऊ नका असे फोन करून मासळी विकणाऱ्या महिलांनी निरोप दिला असल्यामुळे आता ५० टक्के बोटी समुद्रात गेल्याच नाही. ऐरोलीच्या बाजारात मासळी विकली गेली नसल्यामूळे मच्छीमार महिलांना पहिल्यांदाच मासळी फेकून द्यावी लागली.

मच्छीमार महिलांनी घेतली आमदार गीता जैन यांची भेट…

या विषयावर तोडगा काढण्यासाठी उत्तनच्या मच्छीमारांनी आमदार गीता जैन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ऐरोली तेथे मासळी बाजार हळविल्याने होणारा आर्थिक आणि मानसिक त्रास या संबंधी चर्चा केली.

यावेळी उत्तनचे कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी आपली अडचण व होणारी गैरसोय हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी बोलताना एका मच्छीमार महिलेने उद्गार काढले की, “पायातील चप्पल व बूट शोरुममध्ये विकले जातात पण सर्वांना आवडत असलेली आणि माणसांची भोजन व्यवस्था करणारी मासळी मात्र बाजारात घाणीत विकावी लागते हे आमचे दुर्दैव आहे”

हे वाक्य ऐकुन मिरा भाईंदरचे आयुक्त दिलीप ढोले यांनी ही बाब अत्यंत गंभीर आहे असे सुचक उद्गार काढले. याबाबत आमदार गीता जैन यांनी सांगितले की, मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदन देऊन त्यांच्याशी या समस्ये बाबत चर्चा करणार असे आश्वासन उत्तनच्या मच्छीमारांना दिले आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published.