संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
कानपुर येथील परफ्यूम व्यापाऱ्याच्या घरासह इतर ३ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकण्यात आले. या छाप्यात सुमारे १५० कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे (CBIC) अध्यक्ष विवेक जोहरी यांनी दिली. नोटांचे इतके बंडले होते की छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांची मोजणी करताना दमछाक झाली. जवळपास १६ तास रक्कम मोजण्याचे काम सुरु होते. १५० कोटींची ही रक्कम नेण्यासाठी ट्रक मागवावा लागला. सीबीआयसीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी वसुली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कानपुर येथील परफ्यूम व्यापारी पियुष जैन यांचे कन्नौजमध्ये घर, परफ्यूम फॅक्टरी, कोल्ड स्टोअर, पेट्रोल पंपही आहे. पियुष जैन यांचे मुंबईत घर, मुख्य कार्यालय आणि शोरूम आहे. गुरुवारी सकाळी कानपूर, मुंबई आणि गुजरातमध्ये एकाच वेळी छापेमारी सुरू झाली या कारवाईत जैन यांच्या घरातून सुमारे १५० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. नोटांचे बंडल मोजण्यासाठी १५ मशीन मागवाव्या लागल्या. छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांची नोटा मोजणी करताना दमछाक झाली या प्रकरणी जीएसटी इंटेलिजन्सने एक प्रेस नोट जारी केली आहे.
२२ डिसेंबर रोजी त्रिमूर्ती फ्रॅग्रन्सेस लिमिटेडवर छापे टाकण्यात आले असून शुक्रवारी संध्याकाळपर्यंत ही कारवाई सुरु असल्याचे सांगण्यात आले. शिखर ब्रँड अंतर्गत पान मसाला बनविणाऱ्या कंपनीच्या कार्यालय, गोदाम आणि ट्रान्सपोर्ट येथे छापे टाकण्यात आले. बनावट कंपन्यांच्या नावाने टॅक्स इनव्हॉइस जारी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. अधिकाऱ्यांनी कारखान्याच्या बाहेर चार ट्रक जप्त केले आहेत आणि गणपती रोड कुरिअर्समधून २०० बनावट पावत्याही जप्त केल्या आहेत. कानपूरशिवाय कन्नौजमध्येही छापे टाकण्यात आले आहेत. रोकड मोजण्यासाठी स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली. सीबीआयसीच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वसुली आहे, एवढी मोठी वसुली झाल्यानंतर रक्कम नेण्यासाठी २५ पेट्या मागवाव्या लागल्या, त्या ट्रकमध्ये भरून घेऊन गेल्या आहेत.