Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

फुटबॉल खेळणाऱ्या रोबोटचा बिहारमधील शाळकरी मुलांनी केला आविष्कार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

परदेशात लोक मोठ्या प्रमणात रोबोट तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसतात. तर, हळूहळू भारतातही हे तंत्रज्ञान अवलंबले जात आहे. आतापर्यंत हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि हॉस्पिटल्स इत्यादी ठिकाणी रोबोटच्या मदतीने काम सोपे करण्याबद्दल आपण ऐकलं असेल. पण बिहारमधील पाटणा आणि आराहच्या शाळकरी मुलांनी एक जबरदस्त पाऊल उचलत चांगली कामगिरी बजावली आहे. त्यांनी फुटबॉल खेळणारा रोबोट तयार केला आहे. फुटबॉल मैदानावर खेळाडू जसे खेळतात तसे, हा रोबोट मॅटवर फुटबॉल पास करताना, बचाव करताना, मारताना आणि किक मारताना दिसतो. श्रीकृष्ण विज्ञान केंद्रात चालणाऱ्या इनोव्हेशन हबमधील ६ मुलांनी हा रोबोट तयार केला आहे. या मुलांनी काहीतरी नवीन करण्याच्या ध्यासातून फुटबॉल खेळणारा रोबोट तयार केला आहे.

हा रोबोट जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिपमध्ये प्रदर्शित केला जाईल. रोबोटिक्समध्ये रुची असलेल्या या मुलांनी स्वत:ला एक वेगळे स्थान तयार केले आहे. त्यातून रोबोटची रचना केली आहे. ही मुले इयत्ता ११वी आणि १२वी मध्ये शिकतात. विशेष म्हणजे यातील चार मुले सरकारी शाळेतील विद्यार्थी आहेत.

रोबोटची रचना करणाऱ्या टीमचे कॅप्टन हरिओम शरणम सांगतो की, टीममधील सर्व सदस्य रोबोटिक्सच्या क्षेत्रात आपलं करिअर शोधत आहेत.
हरिओमने सांगितले की, विज्ञान केंद्राचे मार्गदर्शक गौरव कुमार आणि इंटरनेट यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर त्यांनी हा रोबोट तयार केला आहे. जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी रोबोट तयार केला. जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी या मुलांच्या मनात रोबोट्स तयार करण्याची भावना निर्माण झाली. या चॅम्पियनशिपच्या एका प्रकारात त्याला रोबो सॉकर स्पर्धेची माहिती मिळाली, त्यानंतर सहा जणांच्या टीमने हा खेळाडू रोबोट तयार करण्यास सुरुवात केली. मार्गदर्शकाच्या नेतृत्वाखाली मुलांनी रोबोटचे कार्य तत्त्व समजून घेऊन रोबोट तयार केला. रोबोट बनवण्यासाठी १० दिवस लागले. तसेच रोबो तयार करण्यासाठी त्यांना सहा ते सात हजार रुपये खर्च करावे लागतात.

मोबाईल फोनवरून नियंत्रित करता येणारा रोबोट..
रोबोटिक्स चॅम्पियनशिप आणि रोबो सॉकर स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांना ३० सेमी लांबी आणि रुंदीचा रोबोट तयार करायचा होता. या मुलांनी गेमच्या नियमांनुसार रोबोटला उर्जा देण्यासाठी १२०० एमएएचच्या सहा बॅटरी आणि ५०० आरपीएमची मोटर वापरली आहे.
त्याचबरोबर हा रोबो चालवण्यासाठी Arduino मायक्रो कंट्रोलरचा वापर करण्यात आला आहे.
हा रोबोट मोबाईल फोनद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो. यासोबतच फ्लाय स्काय रेडिओ रिमोटने नियंत्रित करता येतो.

जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिप २१ ते २४ ऑगस्ट दरम्यान दिल्लीत होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला दोन लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. या स्पर्धेत ५३ देशांचे संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आतापर्यंत ३०० संघांनी नोंदणी केली आहे. रोबो सॉकर प्रकारात, एका संघाला तीन रोबोट तयार करावे लागतात, ज्यामध्ये एक डिफेंडर, स्ट्रायकर आणि गोलकीपर रोबोट असेल. याशिवाय या चॅम्पियनशिपमध्ये आणखी नऊ श्रेणी ठेवण्यात आल्या आहेत, ज्यात फास्टस लाईन फॉलोअर, रोबो रेस, इनोव्हेशन पर्थ इत्यादींचा समावेश आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *