सपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
मुरबाड शहरात काल मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील विद्यानगर भागातील ऍक्सीस बँकेचे एटीएम फोडण्यासाठी तीन चोरटे सिटी होंडा कारने आले होते. त्यावेळी एटीएम फोडून चोरी करण्यासाठी लोखंडी पार, गॅस कटरसह इतर साहित्य घेवून आलेल्या चोरट्यांची खबर गस्तीवर असलेल्या पोलीसांना मिळाली होती. त्यानंतर मुरबाड पोलीसांनी संपूर्ण शहराची नाकाबंदी करून पळून गेलेले तीन आरोपी त्यांच्या होंडा सिटी कारसह रंगेहात पकडले आहेत.
महाराष्ट्राच्या विविध शहरात बँकेच एटीएम फोडून चोरीचे गुन्हे घडत असतानाच मुरबाड पोलीसांच्या सतर्कतेमुळे ऍक्सीस बँकेचे एटीएम फोडणाऱ्या तिघा चोरटयांना गॅस कटरसह एटीएम फोडण्यासाठी लागणारे साहित्य व सिटी होंडा कार जप्त करून तिघांच्या मुसक्या आवळल्याची घटना समोर आली आहे.
पोलीस घटनास्थळी पोहचल्याने ऍक्सिस बँकेचे लाखो रुपये वाचले
मुरबाड शहरात गेल्या काही महिन्यापासून चोरीच्या घटना घडत असल्याने अनेक महिन्यापासून शहरात पोलीसांनी रात्रीची गस्त वाढवली आहे. अश्यातच काल मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील विद्यानगर भागातील ऍक्सीस बँकेचे एटीएम फोडण्यासाठी तीन चोरटे सिटी होंडा कारने आले होते. त्यावेळी एटीएम फोडून चोरी करण्यासाठी लोखंडी पार, गॅस कटरसह इतर साहित्य घेवून आलेल्या चोरट्यांची खबर गस्तीवर असलेल्या पोलीसांना मिळताच मुरबाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, एपीआय सोनोने, पीएसआय तळेकर, पोलीस नाईक रामा शिंदे, अमोल माळी, विजय गांजाळे यांनी घटनास्थळी सापळा रचून ऍटीएम तोडत असतानाच चोरटयांना पकडण्याचा प्रयत्न केला असता तिन्ही चोरटे पळून गेल्याने बँकेचे लाखो रुपये वाचले.
नाकाबंदीमुळे चोरटे पोलिसांच्या तावडीत
त्यानंतर मुरबाड पोलीसांनी संपूर्ण शहराची नाकाबंदी करून पळून गेलेले व लपून बसलेले सर्व तीन आरोपी त्यांच्या होंडा सिटी कारसह रंगेहात पकडले आहेत. या कामगीरीत पीएसआय निंबाळकर, पोह. शेलार, पोना. कैलास पाटील, पोलीस शिपाई चालक भगवान बांगर, पोह. सुरवाडे, दिघे, खंडाळे यांच्याही सहभाग होता. मुरबाड पोलीसांच्या ह्या धाडसी सतर्क पोलीसिंगचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलीसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
मुरबाड शहरातील सर्व बँक व एटीएम, सोनारीची दुकाने , व आर्थिक व्यवहार कारणाऱ्या संस्थाना सुरक्षा रक्षक नेमणे बाबत मुरबाड पोलीसांकडून वेळोवेळी बैठका घेवून, तसेच लेखी कळवून देखिल त्यांनी सुरक्षा रक्षक नेमले नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या पैश्याची बँका काळजी घेत नाहीत. या घटनेनंतर बँक व एटीएम सेंटर बाबत नागरिकांमधून नाराजी पसरली असून सुरक्षा न पुरविणाऱ्या अश्या बँक व्यवस्थापाकावर पोलीसांनी कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे,
पोलीस गस्तीमुळे गुन्ह्यात घट
गेल्या १० महिन्यापासून मुरबाड पोलीसांनी रात्री व दिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त सुरू केली आहे. त्यामुळे गेल्या ८ ते ९ महिन्यात मुरबाड शहारत मध्यरात्री ते पहाटेपर्यत पोलीस अधिकाऱ्यासह पथक सतत गस्त घालत असल्याने शहरात चोऱ्या व गुन्ह्याचे प्रमाण घटल्याची माहिती मुरबाड पोलुस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी दिली आहे. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे यांनी सर्व बँक, एटीएम, सोनाराची दुकाने व आर्थिक व्यवहार संस्था चालकांना रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक ठेवावे असे आव्हान केले आहे.
चोरट्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी
दरम्यान अटक कऱण्यात आलेले चोरटे टिटवाळा भागात वास्तव्यास असून दोघे नगर जिल्ह्यातील मूळ रहिवाशी तर एक चोरटा मूळचा राजस्थानचा असल्याचे पोलीस तपास समोर आले आहे. या चोरट्यांनी इतरही काही ठिकाणी गुन्हे केल्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे. अटक तिन्ही चोरट्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.