संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
आम्ही बहुमत सिद्ध करून बसलो आहोत तरी आम्हाला कंत्राटी मुख्यमंत्री म्हटले जाते मात्र महाराष्ट्राच्या विकासाचे, राज्य समृध्द करण्याचे , सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्याचे , बहुजनांच्या विकासाचे , बाळासाहेबांच्या विचार पुढे नेण्याचे कंत्राट मी घेतले आहे असा जबरदस्त टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत उध्दव ठाकरेंना हाणला.
आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर न चालणार्यांशी फारकत घेतली आहे, आम्ही गद्दार नसून खुद्दार आहोत. आमच्या भूमिकेचे स्वागत राज्यातील जनतेने केले आहे. सध्या वैचारिक दिवाळखोरी ने आमच्यावर टीका केली जात आहे. आम्ही त्याला कामानेच उत्तर देऊ अशी ग्वाही त्यांनी सभागृहात दिली.
बमाझ्या कलागुणांना तुम्ही कधीच वाव दिलाच नाही, माझ्यात ही गुण आहेत, तुम्ही संधीच दिली नाही असा टोला त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांना दिला. तरीही आम्ही कमरेखाली वार करणार नाही, सत्तेची मस्ती डोक्यात जाता कामा नये असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आज पुन्हा त्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या निमित्ताने विरोधकांना धोबीपछाड दिला.