+
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन – मुस्कान मार्फत पुणे आणि पिंपरी – चिंचवड येथे अनेक ठिकाणी बाल सुरक्षा साप्ताह १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत साजरा केला. फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन – मुस्कान ही वीस वर्षापासून बाल लैंगिक अत्याचार (CSA) विरोधात काम करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक जनजागृती, समुपदेशन आणि पुनर्वसन, पोलीस सहकार्य आणि कायदेशीर सहाय्य, केवळ मुलांवरच नव्हे तर तरुण प्रौढ, पालक, शिक्षक, पोलीसांसोबत मिळून बदल घडवून आणण्यासाठी काम करते.”
बालदिनानिमित्त फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन (एफएफसीपी) – मुस्कानने कासारवाडी येथील छत्रपती शाहू महाराज व शुक्रवार पेठेतील डॉक्टर वसंतदादा पाटील माध्यमिक विद्या निकेतन येथे सलग दोन दिवस शाळेतील भिंतीवर “वाँल पेंटिंग” च्या माध्यमातून बाल लैंगिक अत्याचार थांबावा व मुलं सुरक्षित रहावे यासाठी संदेश देण्यात आला. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक सहभाग दर्शविला. संस्थेच्या माध्यमातून विविध ठिकाणी बाल लैंगिक अत्याचार विरोधी या विषयी पथनाट्याचे सादरीकरण केले. यातून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श कसा ओळखावा व असुरक्षित स्पर्श झाल्यास त्याच वेळी नाही म्हणा, सुरक्षित ठिकाणी जा व विश्वासातील व्यक्तीला सांगून या घटनेबाबत कायदेशीर पद्धतीने दाद मागा हा पथनाट्यातून संदेश देण्यात आला व याचे सादरीकरण विविध ठिकाणी करण्यात आले.
बाल सुरक्षा सप्ताह निमित्त, एफएफसीपी – मुस्कान व पोलीस यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड परिसरात बाल लैंगिक अत्याचारापासून मुलांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने व बाल लैंगिक अत्याचाराच्या वास्तविकतेबद्दल लोकांना जागृत करणे आणि त्यांना बोलण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी रॅलीचे आयोजन केले. अशा प्रकरणांबद्दल न घाबरता किंवा लाज न बाळगता एफएफसीपी – मुस्कान संस्थेच्या हेल्प लाईन क्रमांक ९६८९०६२२०२ , ९११२२९९७८५ व ९११२२९९७८४ वरती संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.