Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

काँग्रेस नेते मुझफ्फर हुसैन यांच्यावर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत केंद्रीय निरीक्षक पदाची जबाबदारी

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य, माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्यावर केंद्रीय नेतृत्वाने १० मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायचूर जिल्ह्यातील सिंद्धनौर विधानसभा मतदारसंघाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

सध्या हुसैन प्रचारात सहभागी झाले असून राष्ट्रीय महासचिव एच. के पाटील, सचिव बी.एम. संदीप यांची भेट घेतली. उमेदवार हंपी गौडा , जिल्हा, ब्लॉक काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सदस्यांकडून मतदारसंघातील बूथ कमिटी, मतदान केंद्र आदी कामाचा आढावा हुसैन यांनी घेतला.

महाराष्ट्राच्या राजकारणात मुझफ्फर हुसैन यांचे मोठे योगदान असून पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी त्यांनी विविध पदांवर कार्य करत ती जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. त्यांचा राजकीय अनुभव पाहूनच केंद्रीय नेतृत्वाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी उतरवले आहे.

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या जनता दल ( धर्मनिरपेक्ष) व काँग्रेस या दोन पक्षांमध्ये येथे थेट लढत होत असून भाजप तिसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटकातील ५८- सिंद्धनौर विधानसभा मतदारसंघात थोडा शहरी तर जास्त ग्रामीण भागाचा समावेश असून दोन लाख चाळीस हजार मतदार असून १०७ गावांचा समावेश आहे तर याठिकाणी ८० ग्रामपंचायती आहेत.

प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार हंपी गौडा प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांनी व्यक्त केला आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *